Anvay Naik: हिशेब होईल, तो ही व्याजासकट; अर्णब गोस्वामीप्रकरणी नितेश राणेंचा सरकारला इशारा 

By हेमंत बावकर | Published: November 4, 2020 03:10 PM2020-11-04T15:10:35+5:302020-11-04T15:14:03+5:30

Arnab Goswami arrest: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सकाळी रायगडपोलिसांनी अटक केली. २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली आहे.

will be accounted, with interest; Nitesh Rane warns government in Arnab Goswami arrest | Anvay Naik: हिशेब होईल, तो ही व्याजासकट; अर्णब गोस्वामीप्रकरणी नितेश राणेंचा सरकारला इशारा 

Anvay Naik: हिशेब होईल, तो ही व्याजासकट; अर्णब गोस्वामीप्रकरणी नितेश राणेंचा सरकारला इशारा 

Next

मुंबई : अलिबागचे इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचेअर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. यावरून देशभरात राजकीय वातावरण तापू लागले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीदेखील ट्विट करत लोकशाहीचा गळा घोटल्याचे म्हटले आहे. तर शिवसेनेचे कट्टर विरोधक आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. 

सत्ता आज आहे, उद्या नाही. आज तुमची आहे, उद्या आमची असेल. फक्त एवढे लक्षात ठेवा, हिशेब तर होणार, तेही व्य़ाज लावून, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. 


यावर नारायण राणे यांनीदेखील टीका केली आहे. राज्‍यात बलात्‍कारी, खुनी, अतिरेकी यांच्‍यावर कारवाई नाही. एकदा चौकशी दप्‍तरी दाखल झालेल्‍या प्रकरणात अर्णब गोस्‍वामी यांना अटक का? सरकारने सूडबुध्‍दीने ही कारवाई केली असून अर्णब गोस्‍वामी आणि कंगना राणौत यांना देण्‍यात आलेल्‍या वागणुकीचा मी निषेध करतो. या सरकारला जनहितासाठी राज्‍य चालविण्‍यात संपूर्ण अपयश आले असून अधिकाराचा स्‍वार्थी दुरुपयोग केला जात आहे. कायद्याची जाण आणि अंमलबजावणी करण्‍याची क्षमता ज्‍यांच्‍यामध्‍ये नाही त्यांनी शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्‍यांना बदनाम करु नये, अशी टीका केली आहे. 



तसेच नितेश राणे यांनी म्हटले की, नाईक कुटुंबाला न्याय मिळायलाच हवा. परंतू शिवसेना 2014 पासून सत्ते नव्हती का? त्यांच्याकडे तेव्हा गृह राज्यमंत्री पद होते. तेव्हा का नाही एकाही शिवसेनेच्या आमदाराने विधानसभेत न्यायासाठी आवाज उठविला? जर सुशांत आणि दिशाची मृत्यू झालाच नसता तर आजचा हा तमाशा देखील झाला नसता, असे आरोप केले आहेत. 



अर्णब गोस्वामींनी सूडबुद्धीने पैसे थकवल्यानेच पतीची आत्महत्या; अन्वय नाईक यांच्या पत्नीचा गंभीर आरोप

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सकाळी रायगडपोलिसांनी अटक केली. २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात आता, 'अर्णब गोस्वामींनी सूडबुद्धीने पैसे थकवल्यानेच आपल्या पतीने आत्महत्या केली. अन्यथा माझा पती आज जिवंत असला असता, असा गंभीर आरोप अन्वय यांच्या पत्नीने केला आहे.' त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांची मुलगीही त्यांच्यासोबत होती.


अन्वय यांच्या मुलीने सांगितले, की संबंधित लोकांनी आपल्या पतीचे 83 लाख रुपये थकवल्याचे सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी न्याय देणे अपेक्षित होते. आम्हाला राजकारणात पडायचे नाही. आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही याआधी सर्वाना विनंती केली, तपास अधिकाऱ्यांनी दबाब आणला. आज झालेली अटक आधीच होणे गरजेचे होते. वडिलांनी रिपब्लिकचे टिव्हीचे अर्णब गोस्वामी, आयकास्ट एक्सचे फिरोज शेख आणि नितीन सार्डा या 3 जणांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहिले होती. हा वडिलांचा शेवटचा प्रोजेक्ट होता.

Web Title: will be accounted, with interest; Nitesh Rane warns government in Arnab Goswami arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.