...तेव्हाच पक्ष धनंजय मुंडेंवर कारवाई करेल; पवारांनी सांगितलं राजीनामा न घेण्यामागचं कारण 

By कुणाल गवाणकर | Published: January 15, 2021 02:31 PM2021-01-15T14:31:07+5:302021-01-15T14:35:01+5:30

धनंजय मुंडेंना मोठा दिलासा; पक्ष खंबीरपणे पाठिशी उभा राहणार

will decide the course of action once investigation over says ncp chief sharad pawar over rape allegations on dhananjay munde | ...तेव्हाच पक्ष धनंजय मुंडेंवर कारवाई करेल; पवारांनी सांगितलं राजीनामा न घेण्यामागचं कारण 

...तेव्हाच पक्ष धनंजय मुंडेंवर कारवाई करेल; पवारांनी सांगितलं राजीनामा न घेण्यामागचं कारण 

googlenewsNext

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सौम्य भूमिका घेतली आहे. महिलेचे आरोप ऐकून मी त्यासाठी गंभीर शब्द वापरला होता. मात्र मी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर अनेकांनी त्याच महिलेवर अतिशय गंभीर आरोप केले. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. त्यात तथ्य आढळल्यास पक्षाकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असं शरद पवार म्हणाले. 

धनंजय मुंडे प्रकरणी तक्रारदार महिलेचा यू-टर्न?; “मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे, पण...”

गायक महिलेनं बलात्काराचे आरोप केल्यानं धनंजय मुंडे अडचणीत सापडले. मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली जाऊ लागली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मुंडे यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेतला. याबद्दल शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. पक्षाच्या निर्णयामागची भूमिका त्यांनी यावेळी सांगितली. काल माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी महिलेनं केलेले आरोप मला माहीत होते. त्यामुळे मी त्याबद्दल बोलताना गंभीर असा शब्द वापरला. मात्र त्यानंतर तक्रारदार महिलेवरच एकापेक्षा अधिक गंभीर आरोप झाले आणि ते विविध पक्षातील लोकांनी केले, असं पवारांनी सांगितलं.

धनंजय मुंडेंचा राजीनामा मागताना भाजपाने आपल्याकडे बघावे, सुनील केदार यांचा टोला

'धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेवर काल दिवसभरात काही जणांनी आरोप केले. विशेष म्हणजे आरोप करणाऱ्या व्यक्ती विविध पक्षातल्या आहेत. त्यातील एक व्यक्ती मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या पक्षातील आहे. संबंधित महिला ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप मुंडेसोबतच इतरांनीदेखील केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीत एखादी एसीपी दर्जाची महिला अधिकारी असायला हवी,' असं पवार म्हणाले.

संबंधित महिलेवर तीन व्यक्तींनी अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे. महिलेवरच एकापेक्षा अधिक जणांनी गंभीर आरोप केल्यानं त्यावरून कोणावरही कारवाई करणं योग्य ठरणार नाही. ते अन्यायकारक असेल. त्यामुळे पोलीस तपास पूर्ण व्हायला हवा. त्यात तथ्य आढळल्यास पक्ष योग्य तो निर्णय घेऊन कारवाई करेल, असं पवार यांनी म्हटलं. त्यामुळे मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: will decide the course of action once investigation over says ncp chief sharad pawar over rape allegations on dhananjay munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.