राज्य संकटात असताना मुख्यमंत्री घरात; राष्ट्रपती राजवट लागू करा- खासदार नवनीत राणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 07:47 PM2020-09-16T19:47:10+5:302020-09-16T19:51:29+5:30

खासदार नवनीत राणांची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका; शरद पवारांच्या दौऱ्याचं कौतुक

will demand president rule in state says mp navneet kaur rana attacks cm uddhav thackeray | राज्य संकटात असताना मुख्यमंत्री घरात; राष्ट्रपती राजवट लागू करा- खासदार नवनीत राणा

राज्य संकटात असताना मुख्यमंत्री घरात; राष्ट्रपती राजवट लागू करा- खासदार नवनीत राणा

Next

नवी दिल्ली: राज्यातील कोरोना संकट हाताबाहेर गेलं आहे. त्यामुळे केंद्राकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार असल्याचं अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी सांगितलं. राज्यातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातच बसून आहेत. ते मातोश्रीतून बाहेर पडायला तयार नाहीत. इतर मुख्यमंत्री जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत असताना उद्धव ठाकरे त्यांच्या निवासस्थानाबाहेर निघत नाहीत. त्यामुळेच राज्यातील परिस्थिती भीषण झाल्याचं त्या म्हणाल्या.

तरुणांनो, लागा तयारीला! ठाकरे सरकार पोलीस खात्यातील साडे बारा हजार पदं भरणार

पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील कोरोना संकटात बाहेर पडत नसल्याचं काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यावरही राणा यांनी भाष्य केलं. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल वेगळा असतो. इतर राज्यांचे मुख्यमंत्री जिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आरोग्य व्यवस्था उत्तम राखण्यासाठी बैठका घेत आहेत. मात्र उद्धव ठाकरे घरातच बसले आहेत. ते मातोश्रीबाहेर पडत नाहीत, अशी टीका राणा यांनी केली. 

मंत्री बच्चू कडूंनी उडवली कंगना राणौतची खिल्ली; “ग्रामपंचायत निवडणुकीत उभी राहिली तरी...”

राज्यातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानं राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी लोकसभेत करणार आहे. राज्यातील संपूर्ण परिस्थितीचा ताबा केंद्रानं घ्यावा. त्याशिवाय स्थिती सुधारणार नाही, असं त्या पुढे म्हणाल्या. उद्धव यांच्यावर टीका करताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यशैलीचा उल्लेख केला. शरद पवार एका पक्षाचे प्रमुख आहेत. ते ८० वर्षांचे आहेत. मात्र या परिस्थितीतही ते राज्यभर फिरतात. विविध जिल्ह्यांचा आढावा घेतात, असं राणा यांनी म्हटलं.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रगचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार रडारवर आहेत. यावरून लोकसभेतही वादळी चर्चा सुरू आहे. त्यावर राणा यांनी भाष्य केलं. 'संपूर्ण इंडस्ट्री तशी नाही, याची मला जाण आहे. मीदेखील इंडस्ट्रीत काम केलं आहे. पण अनेक मोठ्या कुटुंबातील कलाकार ड्रग्ज घेतात. काही वर्षांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात क्रिकेटपटूंची नावंदेखील यामध्ये समोर आली होती. त्यामुळे काहींवर आजीवन बंदी घातली गेली,' असं राणा म्हणाल्या.

Web Title: will demand president rule in state says mp navneet kaur rana attacks cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.