पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे, शरद पवारांची घेणार भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 08:51 PM2021-11-24T20:51:50+5:302021-11-24T20:53:39+5:30

या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडून अद्याप ९६ हजार ५०६ कोटी रुपये नैसर्गिक संकटानंतर जाहीर केलेल्या मदतीची रक्कम पोहचली नसल्याचं सांगितले.

Will meet CM Uddhav Thackeray, Sharad Pawar Says West Bengal CM Mamata Banerjee after meet PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे, शरद पवारांची घेणार भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे, शरद पवारांची घेणार भेट

Next

नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamta Banerjee) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. जवळपास ३० मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. यात ममता बॅनर्जी यांनी नैसर्गिक आपत्तीनंतर नुकसान भरपाई आणि सीमा सुरक्षा दलानं राज्यात दखल या मुद्द्यावर चर्चा केली. ममता बॅनर्जी सोमवारी दिल्लीत पोहचल्या होत्या.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, BSF ला जास्त ताकद दिल्यास त्याचा राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होईल. कायदा सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी राज्याची आहे. कूचबिहारमध्ये बीएसएफनं अंधाधुंद गोळीबार केला. बीएसएफशी निगडीत अनेक घटना बंगालच्या सीमावर्ती भागात घडतात. त्यासाठी राज्य सरकारच्या संघराज्य पद्धतीत कुठलीही अडचण नको यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा झाली अशी माहिती त्यांनी दिली.

या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडून अद्याप ९६ हजार ५०६ कोटी रुपये नैसर्गिक संकटानंतर जाहीर केलेल्या मदतीची रक्कम पोहचली नसल्याचं सांगितले. त्रिपुरा येथील हिंसाचाराच्या घटनेवरही पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली. टीएमसी कार्यकर्ता शायनी घोष यांना टार्गेट केले गेले. त्यांची अटक झाली याची माहितीही बैठकीत देण्यात आली. त्याचसोबत पश्चिम बंगालमध्ये २० ते २१ एप्रिल २०२२ मध्ये होणाऱ्या बिझनेस मीटचं आमंत्रण मोदींना देण्यात आले. पंतप्रधानांसोबत बैठकीआधी ममता बॅनर्जी यांनी सुब्रह्यण्यम स्वामी यांची भेट घेतली.



 

उद्धव ठाकरे, शरद पवार यांचीही भेट घेणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रियता दाखवली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी घेत आहेत. ३० नोव्हेंबरला ममता बॅनर्जी मुंबईत येणार आहेत. १ डिझेंबरला बिझनेस इव्हेंटमध्ये त्या सहभागी होतील. ममता बॅनर्जी या दौऱ्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि NCP चे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांचीही भेट घेणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत भेटीवर पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी सांगितले की, मी कुणालाही भेटण्याची वेळ मागितली नाही. केवळ पंतप्रधानांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. पंजाबची निवडणूक आहे. अशावेळी त्या व्यस्त असतील. त्यांना काम करू द्यायला हवं असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.  

Web Title: Will meet CM Uddhav Thackeray, Sharad Pawar Says West Bengal CM Mamata Banerjee after meet PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.