मनसेसोबत युती करणार का?; देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 09:18 AM2021-07-17T09:18:29+5:302021-07-17T09:21:02+5:30

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वपूर्ण विधान

will take decision on right time bjp leader devendra fadnavis on alliance with mns | मनसेसोबत युती करणार का?; देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...

मनसेसोबत युती करणार का?; देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...

Next

नागपूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दलच्या युतीबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सूचक विधान केलं आहे. फडणवीस दिल्लीहून नागपूरला दाखल होताच माध्यमांनी विमानतळावर त्यांना मनसेबद्दलच्या युतीबद्दल प्रश्न विचारला. त्याला फडणवीसांनी अतिशय मोजक्या शब्दांत उत्तर दिलं. त्यामुळे भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

नागपूरला परतलेल्या फडणवीसांना मनसेसोबतच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं. मुंबई महापालिका निवडणुकीला अद्याप वेळ आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असं सूचक विधान फडणवीस यांनी केलं. चंद्रकांत दादांचं विधान तुम्ही पूर्ण समजून घेत नाही. अर्धवट समजून घेता, असंदेखील फडणवीस पुढे म्हणाले.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
“राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवे असलेले नेतृत्व आहे. मात्र, एकट्या मनसेच्या बळावर सत्ता येणे नाही. आमची जुनीच ओळख आहे. योग आला, तर त्यांना नक्की भेटेन. ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत. पण, जोवर मनसे परप्रांतियांबद्दलची भूमिका बदलत नाही, तोवर हे शक्य नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. याच वेळी महापालिकेच्या निवडणूका अद्याप फार दूर आहेत, असंही ते म्हणाले.

'ते' भाजपसोबत येतील असे वाटत नाही 
शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, “आम्ही शिवसेनेसोबत सत्तेत नसलो, तरी आमचे त्यांच्याशी वैरदेखील नाही. आम्ही जनकल्याणासाठी आंदोलनं करतो. तुम्ही एकत्रित निवडणूक लढवता, मुख्यमंत्री पदासाठी वेगळं सरकार चालतं, वेगळ्या विचारांचं सरकार चालतं. परिस्थितीप्रमाणे निर्णय बदलत असतात. मात्र, ते भाजपसोबत येतील असं वाटत नाही,” असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: will take decision on right time bjp leader devendra fadnavis on alliance with mns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.