कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 02:44 PM2021-05-08T14:44:35+5:302021-05-08T14:51:29+5:30

ashish shelar : राज्यातील  तुरंगात कैदी ठेवण्याची क्षमता संपली असल्याने कोरोना संसर्गाची  स्थिती लक्षात घेता या पुढे अत्याआवश्यक असेल तरच आरोपींना अटक करावे, असे आदेश कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी बजावले आहेत.

will you stop arresting the accused in the battle of corona? BJP leader ashish shelar questions to Thackeray government | कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

Next
ठळक मुद्देबनावट अहवाल तयार करुन भांडूपच्या ड्रीम माँलमध्ये सनराइज हाँस्पिटलला अग्निशमन दलाची परवानगी घेतली गेली, असे आशिष शेलार म्हणाले.

मुंबई : देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच राज्यातील तुरुंगात कैदी ठेवण्याची क्षमता संपली आहे. अशा परिस्थितीत सध्या राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता, यापुढे अत्याआवश्यक असेल तरच आरोपींना अटक करावे, असे निर्देश कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिले आहेत. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? असा सवालही आशिष शेलार यांनी केला आहे. (will you stop arresting the accused in the battle of corona? BJP leader ashish shelar questions to Thackeray government)

या संदर्भात भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे. "अर्जुन सकपाळ या तरुणाने बोगस IAS प्रमाणपत्र मिळवून रत्नागिरीत जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याचा बनाव रचला. बनावट अहवाल तयार करुन भांडूपच्या ड्रीम माँलमध्ये सनराइज हाँस्पिटलला अग्निशमन दलाची परवानगी घेतली गेली!" असे आशिष शेलार म्हणाले.

शिवाय. "कोरोनामुळे राज्यातील जेलमध्ये कैद्यांची व्यवस्था लावणे अवघड झाल्याने महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक ( कारगृह) यांनी डीजीपींना पत्र लिहून विनंती केली आहे की, छोट्या गुन्ह्यातील नवीन आरोपी अटक करणे थांबवा! तिन्ही घटना गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहेत." असेही आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

याचबरोबर, " कोरोनाच्या लढाईत अशा किती गोष्टी बोगस करुन सामान्य माणसे फसवली जाणार आहेत? कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? प्रशासन, कायदा सुव्यवस्था, राज्याचा शासकीय कारभार अशा प्रकारे ठाकरे सरकार संपूर्णत: गाठोड्यात बांधून ठेवणार आहे की काय?" असे सवाल सुद्धा आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला केले आहेत.

दरम्यान, राज्यातील  तुरंगात कैदी ठेवण्याची क्षमता संपली असल्याने कोरोना संसर्गाची  स्थिती लक्षात घेता या पुढे अत्याआवश्यक असेल तरच आरोपींना अटक करावे, असे आदेश कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी बजावले आहेत.  ४६ कारागृहांची बंदिवान ठेवण्याची क्षमता २३ हजार २१७ एवढी असून सद्याच्या स्थितीमध्ये ३४ हजार ८९६ कैदी आहेत. क्षमतेपेक्षा ११ हजार ६७९ कैदी अधिक आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कारागृहात संसर्ग वाढू शकतो असे लक्षात आले असल्याने आरोपीची अटक अत्यावश्यक असेल तरच करा, असे निर्देशित करण्यात आले आहे.

("जगात नाचक्की! मोदींना राजकारणविरहित राष्ट्रवादाचा विचार करावा लागेल", शिवसेनेची खोचक टीका)

एप्रिल महिन्यापर्यंत २ हजार ६६४ जणांना तातडीने पॅरोल मंजूर
कोरोना संसर्ग वाढत असल्याने एप्रिल महिन्यापर्यंत २ हजार ६६४ जणांना तातडीने पॅरोल मंजूर करण्यात आले होते. नाशिक, औरंगाबाद, येरवडा, पैठण येथील खुले कारागृह येथून तीनशेपेक्षा अधिक जणांना सुटीवर जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र अजूनही तुरुंग भरलेले आहेत. सर्वाधिक कैदी पुणे  येथील येरवडा कारागृहात असून या कारागृहाची क्षमता २४४९ असून सध्या या कारागृहात सहा हजार ८८ कैदी आहेत. अशीच स्थिती  सातारा, कोल्हापूर , सांगली, सोलापूर, मुंबई, ठाणे, तळोजा, कल्याण येथील कारागृहांतील संख्या क्षमतेपेक्षा खूप अधिक आहे. अशा स्थितीमध्ये कोरोना संसर्ग झाला तर आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण येईल हे लक्षात घेऊन अटक अत्यावश्यक असेल तरच करा, असे आदेश बजावण्यात आले आहेत.

(जुन्या आठवणींना उजाळा, सुप्रिया सुळेंसोबत शरद पवारांची 'मुंबई' सफर!)

Web Title: will you stop arresting the accused in the battle of corona? BJP leader ashish shelar questions to Thackeray government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.