मतदानाबाबत दक्षिण मुंबईतील महिला जागरूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 03:47 AM2019-04-19T03:47:55+5:302019-04-19T03:48:09+5:30

व्यापार केंद्र असलेल्या दक्षिण मुंबईकडे शहराचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष आहे.

Women's awareness about voting in South Mumbai | मतदानाबाबत दक्षिण मुंबईतील महिला जागरूक

मतदानाबाबत दक्षिण मुंबईतील महिला जागरूक

Next

मुंबई : व्यापार केंद्र असलेल्या दक्षिण मुंबईकडे शहराचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. दशकापूर्वी या मतदारसंघातून बहुतांशी नागरिक उपनगरात स्थलांतरित झाले. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांचा आकडा पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हेतर, येथील महिला मतदार आपल्या हक्काबाबत जागरूक असून प्रत्येक निवडणुकीत पुरुषांच्या बरोबरीने मतदानाचा हक्क बजावित असल्याचे दिसून येते.
मंत्री, सनदी अधिकारी आणि बड्या उद्योगपतींचे वास्तव्य असलेल्या या मतदारसंघात तुलनेत कमी मतदान होत असते. मात्र येथील महिला मतदारांच्या संख्येत गेल्या १० वर्षांमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. निम्म्या महिला मतदार मतदानाचा हक्क बजावित आहेत. तर २००९ च्या निवडणुकीत महिला मतदारांनी पुरुषांनाही मागे टाकले होते.५०% महिला मतदार प्रत्येक निवडणुकीत पुरुषांच्या बरोबरीने मतदानाचा हक्क बजावित आहेत.६७%महिला मतदारांनी २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पुरुषांनाही मागे टाकले होते. त्या वेळेस ६४ टक्के पुरुषांनी मतदान केले होते.५२% महिलांनी २०१४ मध्ये मतदानाचा हक्क बजाविला होता. या वर्षी पुरुषांचे प्रमाणही ५२.६३ टक्के म्हणजे जवळपास तेवढेच होते. या वर्षी सुमारे सात लाख महिला मतदार असल्याने त्यांचे मतही महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Women's awareness about voting in South Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.