"अनिल देशमुखांच्या निवासस्थानी १०० कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू, सीबीआयने कारवाई करावी"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 04:07 PM2021-04-05T16:07:40+5:302021-04-05T16:08:04+5:30

Anil Deshmukh News : अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानी आणि कार्यालयात असलेले १०० कोटींच्या प्रकरणासंदर्भातील पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे

Work is underway to destroy evidence worth Rs 100 crore at Anil Deshmukh's residence, CBI should take action - Atul Bhatkhalkar | "अनिल देशमुखांच्या निवासस्थानी १०० कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू, सीबीआयने कारवाई करावी"

"अनिल देशमुखांच्या निवासस्थानी १०० कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू, सीबीआयने कारवाई करावी"

Next

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, या प्रकरणी जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court)आज सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र या राजीनाम्यानंतर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी अनिल देशमुख यांच्यावर अजून एक गंभीर आरोप केला आहे. (Atul Bhatkhalkar Says, Work is underway to destroy evidence worth Rs 100 crore at Anil Deshmukh's residence, CBI should take action)

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला आहे. या ट्विटमध्ये भातखळकर म्हणतात की, मी अत्यंत जबाबदारीने सांगू इच्छितो की, नुकताच राजीनामा दिलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानी आणि कार्यालयात असलेले १०० कोटींच्या प्रकरणासंदर्भातील पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे.सीबीआयने तातडीने आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.  

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवास्थानी ठेवण्यात आलेल्या स्फोटकांचे प्रकरण उघडकीस आल्यापासून राज्याचे गृहमंत्रालय विरोधकांच्या निशाण्यावर आले होते. दरम्यान, या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा असलेला सहभाग आणि परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा केलेला आरोप यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले होते. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. दरम्यान, या वसुली प्रकरणात मुंबई हायकोर्टाने आज सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिकतेचा हवाला देत पदाचा राजीनामा दिला आहे. 

काय आहे १०० कोटी वसुली प्रकरण?
सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे व अन्य पोलीस अधिकाऱ्यांना दरमहा १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिले होते. हे पैसे बार, रेस्टॉरंट व अन्य आस्थापनांद्वारे कमावण्याची सूचना केली होती. तसेच पोलीस बदल्यांत आणि पोस्टिंगमध्येही भ्रष्टाचार होतो. तपासात राजकारण्यांचा हस्तक्षेप होत असल्याचे याचिकेत नमूद आहे. सरकारी वकिलांनी ही याचिका दाखल करून घेण्यावर आक्षेप घेतला. सिंग यांनी त्यांची बदली करण्यात आल्यानंतर याचिका दाखल केली. त्यांना आयुक्तपदावरून गृहरक्षक दलाची जबाबदारी दिल्याने त्यांनी ही याचिका दाखल केली, असे नमूद केले.

Web Title: Work is underway to destroy evidence worth Rs 100 crore at Anil Deshmukh's residence, CBI should take action - Atul Bhatkhalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.