Karnataka CM: येडीयुराप्पा मुख्यमंत्री पद सोडणार; नव्या मुख्यमंत्र्याबाबत म्हणाले, 'सायंकाळपर्यंत समजेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 02:43 PM2021-07-25T14:43:24+5:302021-07-25T14:44:23+5:30

Yeddyurappa can resign soon: नवीन मुख्यमंत्री कोण असेल याच्या नावाची घोषणा आज सायंकाळपर्यंत अपेक्षित आहे. दिल्लीच्या हायकमांडकडून निर्णय येणार आहे, असे येडीयुराप्पा म्हणाले.

Yeddyurappa to step down as CM of Karnataka; Said about new CM, 'will know by evening' | Karnataka CM: येडीयुराप्पा मुख्यमंत्री पद सोडणार; नव्या मुख्यमंत्र्याबाबत म्हणाले, 'सायंकाळपर्यंत समजेल'

Karnataka CM: येडीयुराप्पा मुख्यमंत्री पद सोडणार; नव्या मुख्यमंत्र्याबाबत म्हणाले, 'सायंकाळपर्यंत समजेल'

googlenewsNext

कर्नाटकमध्य़ेमुख्यमंत्री (Karnataka CM) बदलाचे वारे वेगाने वाहू लागले असून आज सायंकाळपर्यंत नवीन मुख्यमंत्री कोण असेल याची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे खुद्द मुख्यमंत्री बीएस येडीयुराप्पा (bs yediyurappa) यांनीच संकेत दिले आहेत. यामुळे येडीयुराप्पा मुख्यमंत्री पदावरून पायऊतार होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. (Yediyurappa will  resign as a CM tomorrow, announcement of New CM Today Evening expected.)

लिंगायत: राजीव गांधी, अडवाणींसारखी चूक परवडणार नाही; येडीयुराप्पांबाबत भाजपा सावध

नवीन मुख्यमंत्री कोण असेल याच्या नावाची घोषणा आज सायंकाळपर्यंत अपेक्षित आहे. दिल्लीच्या हायकमांडकडून हे नाव येणार आहे, असे येडीयुराप्पा म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाचे वारे सुरु झाले होते. तेव्हा काही नेत्यांची नावे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होती. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या बंडाळीमुळे भाजपाने दुसऱ्या नेत्याला नेतृत्व देण्याचा निर्णय पक्का केला आहे. 

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कोण? (Who is next CM of Karnataka)

2023 मध्ये निवडणुका होणार आहेत. खाण मंत्री मुरगेश निरानी, गृह मंत्री बसवराज बोमाई, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि चौथे बसवंगौड़ा पाटील यतनाल यांची नावे चर्चेत आहेत. यतनाल यांनीच येडीयुराप्पांना हटविण्याची मागणी केली होती. तर आता निरानी यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे नाव चर्चेत आहे. यामुळे या दोघांपैकीच मुख्यमंत्री होणार की लिंगायत समाजाचा नेता सोडून अन्य कोणत्या समाजाच्या नेत्याला मुख्यमंत्री पद मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे. 

Karnataka CM: मुख्यमंत्री पद सोडतो, पण तीन अटी मान्य करा; येडीयुराप्पांमुळे भाजपा नेतृत्वासमोर मोठा पेच

येडीयुराप्पांच्या तीन अटी...
येडीयुराप्पा हे गेल्या आठवड्यात दिल्लीला गेले होते. दोन दिवस त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi), गृहमंत्री अमित शहा  (Amit Shah)  आणि भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. यानंतर राज्यात येत त्यांनी 26 जुलैरोजी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. आज दिल्लीतून आदेश येताच उद्या येडीयुराप्पा बैठकीत राजीनामा देण्याची शक्यता आहे. 

येडींनी दिल्लीच्या नेत्यांसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. खासदार असलेला मोठा मुलगा बी.एस राघवेंद्रला केंद्रात मंत्रिपद, दुसरा मुलगा बी.एस. विजेंद्र याला राज्यात मंत्रिपद आणि मुख्यमंत्री मी सांगेन तोच, अशा या अटी आहेत. 

Web Title: Yeddyurappa to step down as CM of Karnataka; Said about new CM, 'will know by evening'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.