'तुम्ही भाजपाचे खासदार, मग मोदींना भेटत का नाही?' ट्विटरवरील प्रश्नावर सुब्रमण्यम स्वामींचे उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 05:51 PM2021-05-23T17:51:17+5:302021-05-23T17:52:42+5:30

Subramanian Swamy told 5 years old story with PM Narendra modi: स्वामी नेहमी सरकारविरोधात बोलत असल्याने अनेकांना हाच प्रश्न पडला आहे. ते भाजपाचे खासदार आहेत. मग त्यांच्यासाठी पंतप्रधान एका फोन कॉलवर त्यांना भेटू शकतात. मग एवढी नाराजी का? यावर स्वामी यांनी पाच वर्षांपूर्वीची घटना सांगितली आहे.

"You are a BJP MP, so why don't you meet PM Modi?" subramanian swamy's answer to the question on Twitter ... | 'तुम्ही भाजपाचे खासदार, मग मोदींना भेटत का नाही?' ट्विटरवरील प्रश्नावर सुब्रमण्यम स्वामींचे उत्तर...

'तुम्ही भाजपाचे खासदार, मग मोदींना भेटत का नाही?' ट्विटरवरील प्रश्नावर सुब्रमण्यम स्वामींचे उत्तर...

googlenewsNext

कशाचीही तमा न बाळगता भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) हे केंद्र सरकारवर जहरी प्रहार करत सुटले आहेत. मोदी सरकारमध्ये एकमेव असे हे खासदार आहेत, जे सरकारविरोधात उघड उघड नाराजी व्यक्त करतात आणि त्यांना विरोधही केला जात नाही. कोरोना संकट, लसीकरण ते चीन या साऱ्या आघाड्यांवर त्यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारला घेरलेले आहे. यामुळे ट्विटरवर एका युजरने त्यांना ''तुम्ही तर भाजपाचे खासदार, मग मोदींना भेटत का नाही?'', असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी या प्रश्नावर उत्तर दिले आहे. (My five year old telephone call picked up by his appointment secretary Bhausar is still pending.: subramanyam swami)


युजरच्या या प्रश्नावर स्वामींनी आपण का पंतप्रधानांवर नाराज असतो याचे उदाहरण दिले आहे. स्वामी नेहमी सरकारविरोधात बोलत असल्याने अनेकांना हाच प्रश्न पडला आहे. ते भाजपाचे खासदार आहेत. मग त्यांच्यासाठी पंतप्रधान एका फोन कॉलवर त्यांना भेटू शकतात. मग एवढी नाराजी का? यावर स्वामी यांनी पाच वर्षांपूर्वीची घटना सांगितली आहे. (Why Subramanian Swamy not want to meet Narendra Modi? read the answer.)


स्वामींनी या ट्विटला रिप्लाय देताना म्हटले की, पाच वर्षांपूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. तो टेलिफोन कॉल त्यांचे अपॉईंटमेंट सेक्रेटरी भावसार यांनी उचलला होता, जो आजपर्यंत तसाच लटकलेला आहे.



स्वामी यांनी पुढे सांगितले की. जेव्हा मोदी मुख्यमंत्री होते, तेव्हा भावसार यांनीच मला कर्णावतीवरून फोन करून अपॉईंटमेंट फिक्स करण्य़ास सांगितली होती. अमित शहा एप्रिल 2014 मध्ये माझ्याकडे आले होते. मदत मागणाऱ्या मोदींचा मी एक फोन उचलावा, अशी विनंती घेऊन. 


यावर अन्य एका युजरने स्वामींना चांगलेच सुनावले. तुम्हीच मोदींना ताकदवान बनविण्य़ासाठी जबाबदार आहात. मी अशा अनेकांना ओळखतो, ज्यांनी तुमच्या सांगण्यावरून भाजपाला मत दिले. यावर स्वामींनी सांगितले की, मी आजही भाजपालाच मतदान करा असे सांगेन. कारण हा एकमेव असा पक्ष आहे जो कोणताही परिवार चालवत नाही. 

सुब्रमण्यम स्वामी यांचे ट्विटरवर एक कोटीच्या वर फॉलोअर आहेत. त्यांनी प्रसिद्ध हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून पीएचडी केली आहे. ते दिल्लीच्या आयआयटीमध्ये प्राध्यपकही होते. तसेच योजना आयोगाचे सदस्यदेखील राहिले आहेत. मोठ्या विद्यापीठात शिकलेल्या स्वामींकडे एक चिंतन करणारा नेता म्हणून पाहिले जाते. अनेकदा ते पक्षाच्या, पक्ष नेतृत्वाच्या विरोधातही उभे राहिलेले आहेत. 

Web Title: "You are a BJP MP, so why don't you meet PM Modi?" subramanian swamy's answer to the question on Twitter ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.