तीन तालुक्यातील ऑक्सिजन जनरेटर मशिनसाठी १ कोटी २३ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:10 AM2021-04-23T04:10:39+5:302021-04-23T04:10:39+5:30
भोर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय ५५ ऑक्सिजन बेड, वेल्हे ग्रामीण रुग्णालय ३५ व पौड ग्रामीण रुग्णालय ३५ ऑक्सिजन बेड आहेत. ...
भोर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय ५५ ऑक्सिजन बेड, वेल्हे ग्रामीण रुग्णालय ३५ व पौड ग्रामीण रुग्णालय ३५ ऑक्सिजन बेड आहेत. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र देशमुख यांची भेट घेतली होती या बैठकीत पुणे जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयांच्या अधिपत्याखाली असलेल्या कोविड सेंटर्ससाठी मेडिकल ग्रँड ऑक्सिजन जनरेटर मशीन कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी केली होती. या मागणीला अनुसरून ४ कोटी १० लाख रुपयांच्या कामांना शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
यामध्ये भोर विधानसभा मतदार संघातील उपजिल्हा रुग्णालय भोर, ग्रामीण रुग्णालय वेल्हा व ग्रामीण रुग्णालय पौड या ठिकाणी कार्यान्वित करण्यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १ कोटी २३ लाखांच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच निविदा काढून हे काम पूर्ण करण्याच्या प्रशासनाकडून सूचना देखील देण्यात आल्या आहेत.