इंदापूर शहराला १ कोटी ८ लाखांची गॅस शवदाहिनी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:09 AM2021-05-23T04:09:10+5:302021-05-23T04:09:10+5:30
इंदापूर शहरावर मागील चौदा महिन्यांपासून कोरोनाचे तीव्र संकट आहे. या संकटात अनेकांची प्राणज्योत मालवली. एखाद्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ...
इंदापूर शहरावर मागील चौदा महिन्यांपासून कोरोनाचे तीव्र संकट आहे. या संकटात अनेकांची प्राणज्योत मालवली. एखाद्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वृक्षतोड झाल्याने लाकडाची कमतरता तर वाढलेले इंधनाचे दर या समस्यासह. रात्री-अपरात्री अंत्यविधी पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांनाही मोठी समस्या निर्माण होत होती. इंदापूर नगरपरिषदेच्या स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविणे या कामासाठी १ कोटी ८ लाख ६४ हजार रकमेचे अंदाजपत्रक तयार त्यानुसार इंदापूर नगरपरिषदेच्या स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविणे या कामासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांच्या दि. २२ मार्च २०२१ रोजीच्या सह ८० लाख ३८ हजार तसेच कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग क्र.१ पुणे यांचेकडून प्रस्तूत कामाचे सिव्हिल वर्कसाठी २८ लाख २६ हजार असे एकूण १ कोटी ८ लाख ६४ हजारच्या कामास जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे. लवकरच ही गॅस शवदाहिनी कार्यन्वित होऊन कोरोनाच्या संकटात इंदापूरकरांना अंत्यविधीकामी मोठा दिलासा मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांकडे हा मुद्दा लावून धरला होता.
कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांच्या पैशांची होणार बचत
सध्या इंदापूर स्मशानभूमीत एक कोरोना रुग्णाचा अंत्यविधी करण्यासाठी लाकडे, पीपीई किट, डिझेल व अंत्यविधी करणारे कष्टकरी यांचे मानधन असे प्रत्येक एका अंत्यविधीला सहा हजार रुपये खर्च, कोरोनाने मयत झालेल्या रुग्णांकडून घेतले जातात. गॅस शवदाहिनी लवकर झाल्यास कोरोनाने मयत होत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचा आर्थिक खर्च वाचणार आहे. त्यामुळे ह्या गॅस शवदाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश
इंदापूर शहरात मागील वर्षभरात जवळपास हजारो कोरोनाबाधित रुग्ण मृत्यू पावले. त्यांचा अंत्यविधी सहा महिन्यांपूर्वी शासनालाच करावे लागत होता. त्यावेळी मृत्यूप्रमाण नगण्य होते. मात्र, सध्या कोरोनाचा मृत्यूदर प्रचंड वाढला असून, इंदापूर स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी जागा पुरत नाही. त्यामुळे इंदापूर शहराला विद्युत अथवा गॅसदाहिनीची नितांत गरज आहे. अशा आशयाची बातमी दैनिक लोकमतने २७ सप्टेंबर २०२० रोजी बातमी प्रसिद्ध करून पाठपुरावा केला होता.
‘लोकमत’ला प्रसिद्ध झालेली बातमी