VIDEO: पुण्यात दुबईहून आलेल्या विमानातून १ किलो सोने जप्त; सीटखाली लपवली होती सोन्याची पेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 15:10 IST2024-06-06T15:02:17+5:302024-06-06T15:10:27+5:30
बुधवारी दुबईतून आलेल्या SG-52 या विमानातून सोने तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती....

VIDEO: पुण्यात दुबईहून आलेल्या विमानातून १ किलो सोने जप्त; सीटखाली लपवली होती सोन्याची पेस्ट
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pune International Airport) तब्बल एक किलो (१०८८.३ ग्रॅम) चोवीस कॅरेट सोने जप्त करण्यात आले. ही कारवाई बुधवारी (५ जून) रोजी करण्यात आली. दुबईहून आलेल्या एका प्रवाशाने त्याच्या सीटखालील पाईपमध्ये सोने लपवले होते. पोलिसांना आणि कस्टम विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर तपासणी केल्यानंतर आरोपीच्या सीटखाली हे सोने आढळले.
बुधवारी दुबईतून आलेल्या SG-52 या विमानातून सोने तस्करी होत असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी आणि झाडाझडती केली. त्यावेळी वैयक्तिक झडतीत किंवा सामानाच्या तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. यामुळे कस्टम विभागही काही काळ गोंधळून गेले होते. नेमके या प्रवाशाने सोने कुठे ठेवले असेल? हा प्रश्न पडला होता.
प्रवाशाचे वर्तन अतिशय संशयास्पद असल्याने त्याने विमानात काही लपवले आहे का, अशी विचारणा केली. त्याने दिलेल्या उत्तरांमुळे कस्टम विभागाचा संशय आणखी वाढला. त्यानंतर त्याच्या सीटसह विमानातील इतर काही जागा शोधण्यात आल्या. झडतीदरम्यान तो बसलेल्या सीटखाली पाईपमध्ये सोन्याच्या पेस्टचे पाकीट लपवून ठेवलेले आढळून आले. हे जप्त केलेले सोने २४ कॅरेटचे होते. वजन १०८८ असून त्याची किंमत ७८ लाख १ हजार ४३ रुपये आहे. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुण्यात दुबईहून आलेल्या विमानातून १ किलो सोने जप्त; सीटखाली लपवली होती सोन्याची पेस्ट#puneairportpic.twitter.com/T0BGfEguOA
— Lokmat (@lokmat) June 6, 2024