दोघा खातेदारांकडून १ लाख १० हजार रुपये परत मिळविले : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 09:29 PM2018-08-21T21:29:50+5:302018-08-21T21:30:34+5:30

कॉसमॉस बँकेच्या गणेशखिंड येथील मुख्यालयातील एटीएम सर्व्हर हॅक करुन हॅकर्सनी ११ व १३ आॅगस्ट या तीन दिवसात काळात ९४ कोटी ४२ लाख रुपये इतकी मोठी रक्कम लुटली होती.

1 lakh 10 thousand rupees recovered from account holders: Cosmos Bank cyber attack case | दोघा खातेदारांकडून १ लाख १० हजार रुपये परत मिळविले : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरण

दोघा खातेदारांकडून १ लाख १० हजार रुपये परत मिळविले : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरण

Next
ठळक मुद्देग्राहकांच्या खात्यात झाले होते पैसे जमा

पुणे : कॉसमॉस बँकेचे एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून हॅकर्सने टाकलेल्या आॅनलाइन दरोड्याच्यावेळी  कॉसमॉस बँकेच्याच काही ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्यापैकी काही जणांनी हॅकींग सुरू असतानाच पैसे काढले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात दोघे जण आढळले़. त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख १० हजार रुपयांची रक्कम परत मिळविली. 
कॉसमॉस बँकेच्या गणेशखिंड येथील मुख्यालयातील एटीएम सर्व्हर हॅक करुन हॅकर्सनी ११ व १३ आॅगस्ट या तीन दिवसात काळात ९४ कोटी ४२ लाख रुपये इतकी मोठी रक्कम लुटली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांनी तत्काळ विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. त्यानंतर पथकाने तत्काळ  पुणे, कोल्हापूर, मुंबई व इंदौर या शहरांमधील ज्या एटीएममधून पैसे काढले गेले आहे, त्यावर लक्ष केंद्रित केले. 
दरम्यान, पोलिसांनी बँकेच्या काही ग्राहकांच्या खात्याची तपासणी केली. त्यावेळी ११ ते १३ आॅगस्ट या कालावधीत काही जणांनी सातत्याने एटीएममधून पैसे काढल्याचे आढळले. त्यानुसार एसआयटी पथकातील व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे व पोलिस निरीक्षक राधिका फडके यांना तपासादरम्यान हा प्रकार निदर्शनास आला. 
पोलिसांनी काही बँकेच्या ग्राहकांशी संपर्क साधून त्यांच्या खात्यामध्ये जादा पैसे जमा झाल्याबाबत विचारणा केली. त्यावेळी पुण्यातील दोन जणांनी आपल्या खात्यामध्ये अचानक जादा पैसे जमा झाल्याचे सांगितले. तसेच हव्यासापोटी आपण पैसे काढल्याची कबुलीही दिली. हॅकींगवेळी बँकेचे ग्राहक असलेल्यांच्या पुण्यातील एकाच्या खात्यामध्ये ९० हजार, तर दुसऱ्याच्या खात्यातून २० हजार होते. दोघांकडूनही पैसे परत मिळविले असल्याची माहिती पायगुडे यांनी दिली. 
अशाप्रकारे कोल्हापूर व इतर शहरातील आणखी काही खातेदारांच्या खात्यात जादा पैसे जमा झाल्याची माहिती मिळत असून त्यांच्याकडून हे पैसे परत मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे़ 

Web Title: 1 lakh 10 thousand rupees recovered from account holders: Cosmos Bank cyber attack case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.