गुन्ह्यात मदत करण्यासाठी मागितली १ लाखांची लाच; पोलीस उपनिरीक्षकाला अटक

By विवेक भुसे | Published: October 2, 2022 03:31 PM2022-10-02T15:31:57+5:302022-10-02T15:32:06+5:30

जुन्नर तालुका बार असोशिएशनच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल

1 lakh bribe demanded to aid in crime Police sub-inspector arrested | गुन्ह्यात मदत करण्यासाठी मागितली १ लाखांची लाच; पोलीस उपनिरीक्षकाला अटक

गुन्ह्यात मदत करण्यासाठी मागितली १ लाखांची लाच; पोलीस उपनिरीक्षकाला अटक

Next

पुणे : दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अमोल पाटील असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

तक्रारदार यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटील व जुन्नर तालुका बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. केतनकुमार पडवळ यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिला. त्याची पडताळणी केली असता त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्यानंतर प्रत्यक्ष सापळा कारवाई होऊ शकली नाही. मात्र, लाच मागितल्याचे आढळून आल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करुन अमोल पाटील व ॲड.केतनकुमार पडवळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पाटील याला अटक केली असून सध्या त्याला न्यायालयात नेण्यात आले आहे.
 

Web Title: 1 lakh bribe demanded to aid in crime Police sub-inspector arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.