नेव्हीतील वरिष्ठ सहकारी असल्याचे भासवून १ लाखाचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:24 AM2021-01-13T04:24:49+5:302021-01-13T04:24:49+5:30

पुणे : इंडियन नेव्हीत असताना वरिष्ठ अधिकारी असलेल्यांच्या नावाने ई मेल पाठवून मुलगी व मी लॉस एंजलिसमध्ये अडकून पडल्याचे ...

1 lakh gang pretending to be a senior colleague in the Navy | नेव्हीतील वरिष्ठ सहकारी असल्याचे भासवून १ लाखाचा गंडा

नेव्हीतील वरिष्ठ सहकारी असल्याचे भासवून १ लाखाचा गंडा

Next

पुणे : इंडियन नेव्हीत असताना वरिष्ठ अधिकारी असलेल्यांच्या नावाने ई मेल पाठवून मुलगी व मी लॉस एंजलिसमध्ये अडकून पडल्याचे सांगून वकिलाला एक लाख रुपये पाठविण्यास सांगून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी अरविंद पुथिया (वय ७१, रा. भोसलेनगर) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आसिफ अली व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

इंडियन नेव्हीमध्ये काम करत असताना जी. के. झंगयानी हे पुथिया यांचे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांच्या नावाने पुथिया यांना सप्टेंबर २०१० मध्ये एक ई मेल आला. त्यात त्यांनी मी व माझी मुलगी लॉस एंजलिसमध्ये अडकलो आहे. तसेच भारतातील इतर माझे सोबतचे लोक असे आहेत, असा भावनिक मेसेज पाठविला. मुंबई येथील कोर्टात मालमत्तेचा वाद चालू आहे. त्यासाठी वकील आसिफ अली याला १ लाख रुपये द्यायचे आहेत, असे बोलून भारतात परत आल्यावर पैसे देतो, असा मजकूर ई मेलमध्ये होता. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा ई मेल असल्याचे वाटून पुथिया यांनी त्यांनी दिलेल्या खात्यावर पैसे पाठिवले. त्यानंतर त्यांच्याकडे अजून १ लाख रुपये पाठविण्यास सांगितले. तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 1 lakh gang pretending to be a senior colleague in the Navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.