स्कूल बसखाली सापडून १ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; इंदापूरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 18:14 IST2025-01-15T18:13:48+5:302025-01-15T18:14:15+5:30

चालकाने गाडीच्या समोर कोणी आहे काय? याची खात्री न करता भरधाव वेगात गाडी चालवली

1-year-old child dies after being found under school bus; Incident in Indapur | स्कूल बसखाली सापडून १ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; इंदापूरातील घटना

स्कूल बसखाली सापडून १ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; इंदापूरातील घटना

भिगवण: कुंभारगाव (ता. इंदापूर) येथे स्कूल बसखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. १३) चारच्या सुमारास घडली. यामध्ये स्वराज महेश काशिद (वय १ वर्ष) या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताबाबत भिगवण पोलिस स्टेशनला गणेश बबन काशिद यांच्या फिर्यादीवरून बसचालक रोहित हनुमंत पवार (रा. पोंधवडी, ता. इंदापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्कूल बस क्रमांक एमएच. ४२, बी. ०१९६ ही कुंभारगाव येथून मुलांना शाळेमधून सोडत असताना गाडी भरधाव वेगात चालवल्याचे समोर आले आहे. गाडीच्या समोर कोणी आहे काय? याची खात्री न करता तशी गाडी भरधाव वेगात पुढे घेतल्याने समोर स्वराज काशिद हा आल्यावर त्याला धडक बसली. तसेच फरपटत पुढे नेऊन त्याच्या पोटास गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर बसचालक फरार झाला होता.

Web Title: 1-year-old child dies after being found under school bus; Incident in Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.