ओतूर परिसरात १० कोरोना पाँझिटिव्ह सापडले .
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:12 AM2021-03-16T04:12:24+5:302021-03-16T04:12:24+5:30
ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेत गेल्या आठवडयापासून दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे ,असे ओतूर चे वैद्यकीय ...
ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेत गेल्या आठवडयापासून दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे ,असे ओतूर चे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी सांगितले. ओतूर परिसरातील डिंगोरे २ ,ओतूर शहर ३ ,ठिकेकरवाडीत २ डुंबरवाडी त १मांदारणे २ असे तब्बल १० कोरोना बाधित सापडले आहेत.
ओतूर परिसरातील बाधितांची एकूण संख्या ९५२ झाली आहे. त्यातील ८७८ बरे झाले आहेत १९ जणावर उपचार सुरू केले आहेत .७ जण घरीच उपचार घेत आहेत ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.
डिंगोरे येथील रुग्णांची संख्या ६५ झाली असून त्यातील ६२ बरे झाले आहेत. १जण उपचार सेंटर मध्ये तर १ घरीच उपचार घेत आहे. एकाचा मृत्यू झाला आहे.
ओतूर शहरातील बाधितांची संख्या४८० झाली आहे ,४४६ बरे झाले आहेत. ९ जण कोव्हीड सेंटर व १ जण घरीच उपचार घेत आहे२४ जणांचा मृत्यू झाला आहे.
ठिकेकरवाडी मध्ये ४७ बाधित झाले आहेत. त्यातील ४० बरे झाले आहेत. २जण घरीच उपचार घेत आहेत. ५जणांचा मृत्यू झाला आहे .
डुंबरवाडीत बाधितांची संख्या २९ झाली आहे, २५बरे झाले आहेत. ३ जण उपचार घेत आहेत. १जण घरीच उपचार घेत आहे.
मांदारणे येथील बाधितांची संख्या ६ झाली आहे. त्यातील ४ बरे झाले आहेत, २जण घरीच उपचार घेत आहेत.
७ मार्च पासून परिसरात रुग्णांची संख्या दररोज वाढू लागली आहे. .असे वैद्यकीय अधिकारी डाॅ सारोक्ते म्हणाले