‘सुयश अॅटो’च्या वतीने सभासदांना १० टक्के लाभांश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:09 AM2021-07-10T04:09:00+5:302021-07-10T04:09:00+5:30
या वेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन भारत जाधव म्हणाले, संस्थेची वाटचाल उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे. पतसंस्थेने आतापर्यंत कोणत्याही बँकेचे कर्ज ...
या वेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन भारत जाधव म्हणाले, संस्थेची वाटचाल उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे. पतसंस्थेने आतापर्यंत कोणत्याही बँकेचे कर्ज घेतले नाही. संस्थेचे आपल्या चांगल्या नियोजनामुळे आतापर्यंत ‘अ’ वर्ग मानांकत प्राप्त केल्याचे अध्यक्ष जाधव म्हणाले. तसेच यंदा सभासदांना १० टक्के लाभांश चेअरमन जाधव यांनी जाहीर केला.
या वेळी राजेंद्र हाके, प्रितम गेडामे, धर्मेंद्र घोडके, सोमनाथ माने, अशोक पवार यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष पोपट घुले, सचिव नंदकुमार गवारे तसेच कंपनीचे जनरल मॅनेजर मनोज इंगळे व महेंद्र निगडे व शिरीष राऊत व खजिनदार सोमनाथ भोंग, संचालक संजय पवार, नागेश जाधव, लालासाहेब भोंग, दिनेश देशमुख, विनोद ठोंंबरे, धर्मेंद्र घोडके, संजय कांबळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिनेश देशमुख यांनी केले.
————————————————
सभेत बोलताना संस्थापक चेअरमन भारत जाधव. या वेळी उपस्थित महाव्यवस्थापक मजोज इंगळे आणि अन्य.
०९०७२०२१ बारामती—०९