क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून १० लाखांची फसवणूक

By भाग्यश्री गिलडा | Published: January 4, 2024 06:41 PM2024-01-04T18:41:34+5:302024-01-04T18:42:33+5:30

हडपसर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

10 Lakh Fraud by Asking to Invest in Crypto Currency | क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून १० लाखांची फसवणूक

क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून १० लाखांची फसवणूक

पुणे : क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी बुधवारी (दि. ०३) हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी बुद्रुक परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीने याबाबत फिर्याद दिली आहे. हा प्रकार २ ऑक्टोबर २०२३ ते १५ ऑक्टोबर २०२३ दरम्यान घडला आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे तक्रारदार यांना अनोळखी क्रमांकावरून व्हॅट्सऍपवर मेसेज पाठवला. क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर नफा मिळेल असे सांगून तक्रारदार यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड केले. गुंतवणूक केल्यास प्रचंड पैसे आहे, असे भासवून तक्रारदार यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्यानंतर बनावट वेबसाईटच्या आधारे खोटा नफा मिळत असल्याचे भासवून तक्रारदार यांना एकूण ९ लाख ९२ हजार रुपये भरण्यास प्रवृत्त केले. मात्र प्रत्यक्षात ते पैसे विड्रॉल केले असता त्यामध्ये अडचणी येत होत्या, त्यामुळे तक्रारदार यांनी विचारणा केली असता पैसे काढण्यासाठी आणखी पैसे भरावे लागतील असा तगादा लावण्यात आला. आपली फसवणूक झाली असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक डगळे करत आहेत.

Web Title: 10 Lakh Fraud by Asking to Invest in Crypto Currency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.