कोकणातील पूरग्रस्तांना दिले १० लाखांचे साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:10 AM2021-07-30T04:10:38+5:302021-07-30T04:10:38+5:30

आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी काँग्रेस व मानसिंग पाचुंदकर मित्र मंडळ यांच्या वतीने तांदूळ, डाळी, अन्नधान्य आदी सुमारे १० लाखांचे ...

10 lakh materials given to flood victims in Konkan | कोकणातील पूरग्रस्तांना दिले १० लाखांचे साहित्य

कोकणातील पूरग्रस्तांना दिले १० लाखांचे साहित्य

Next

आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी काँग्रेस व मानसिंग पाचुंदकर मित्र मंडळ यांच्या वतीने तांदूळ, डाळी, अन्नधान्य आदी सुमारे १० लाखांचे साहित्य घेऊन वाहने आज रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथून महाड येथे रवाना करण्यात आली. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक ॲड. प्रदीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर, माजी सभापती प्रकाश पवार, आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, माजी सभापती विश्वास कोहकडे, शिवाजी शेळके, दत्तात्रय कदम, अमोल जगताप, बाळासाहेब भोर, युवा उद्योजक ज्ञानेश्वर पाचुंदकर, सचिन दुंडे, गणेश लांडे, शुभम नवले, नवनाथ लांडे, दशरथ फंड,अनिल दुंडे,मोहन शेळके उपस्थित होते.

२९ रांजणगाव गणपती

रांजणगाव गणपती येथून महाड येथे पूरग्रस्तांना मदत पाठविण्यात आली.

Web Title: 10 lakh materials given to flood victims in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.