दहावी- बारावी परीक्षेत १० मिनिटे मिळणार जास्त; राज्य शिक्षण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 07:34 AM2024-01-25T07:34:21+5:302024-01-25T07:34:31+5:30
राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी बुधवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेत गतवर्षी परीक्षा सुरू होण्याच्या दहा मिनिटे पूर्वी प्रश्नपत्रिका देण्याची पद्धत बंद केली होती, तसेच परीक्षेच्या एकूण कालावधीत दहा मिनिटे वेळ वाढवून दिला होता. यंदाही फेब्रुवारी - मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी- बारावी परीक्षेत हीच पद्धत कायम ठेवण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी बुधवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षांच्या वेळीही सकाळच्या सत्रात सकाळी ११ वाजता तसेच दुपारच्या सत्रात दुपारी ३ वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल. तसेच परीक्षेच्या शेवटी दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
परीक्षेच्या अर्धा तास आधी उपस्थित राहावे
सकाळच्या सत्रात स. १०:३० वाजता तसेच दुपारच्या सत्रात दु.२:३० वाजता परीक्षार्थ्याने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
परीक्षेची सध्याची वेळ आणि कंसात (सुधारित वेळ)
सकाळचे सत्र
nस. ११ ते २ (दु. २:१०)
nस. ११ ते दु. १ (दु. १:१०)
nस. ११ ते दु. १:३० ( दु.१:४०)
दुपारचे सत्र
nदु. ३ ते सायं. ६ (सायं. ६:१०)
nदु. ३ ते सायं. ५ (सायं. ५:१०)
nदु. ३ ते सायं. ५:३० (सायं. ५:४०)