10 rupees Coin| १० रुपयांच्या नाण्यांवर बंदी आहे का? काय आहे RBI चा आदेश...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 12:54 PM2022-02-14T12:54:16+5:302022-02-14T12:54:50+5:30

पुणे : शहरात १० रुपयांचे नाणे चलणात आहे. सोशल मीडियावर दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याचे चुकीची माहिती पसरवली गेल्याने ...

10 rupees coin Is there a ban on coins what is rbi order | 10 rupees Coin| १० रुपयांच्या नाण्यांवर बंदी आहे का? काय आहे RBI चा आदेश...

10 rupees Coin| १० रुपयांच्या नाण्यांवर बंदी आहे का? काय आहे RBI चा आदेश...

googlenewsNext

पुणे : शहरात १० रुपयांचे नाणे चलणात आहे. सोशल मीडियावर दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याचे चुकीची माहिती पसरवली गेल्याने या नाण्यांबाबत गैरसमज पसरला आहे. मात्र, पुणे शहरात दहा रुपयांच्या नाण्यावर कोणत्याही प्रकारची बंदी नाही. त्यामुळे कोणत्याही दुकानदार अथवा बँका, रिक्षा, टॅक्सी चालकांनी हे नाणे नाकारू नये, असे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दहा रुपयांचे नाणे सर्वांनी स्वीकारायलाच हवे, असे निवेदन दिले आहे.

दहा रुपयाचे नाणे नाकारू शकत नाही

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दहा रुपयांचे नाणे सर्वांनी स्वीकारायलाच हवे. ते कोणीही नाकारू शकत नाही, असे स्पष्टीकरण सभागृहात दिले आहे. राज्यात काही ठिकाणी हे नाणे स्वीकारले जात नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, पुणे शहरात दहा रुपयांच्या नाण्यावर कोणत्याही प्रकारची बंदी नसून दैनंदिन चलनात त्याचा वापर सुरू आहे.

दहा रुपयाचे नाणे हे घेतात

पुणे शहरात दूध डेअरी, किराणा मालाचे दुकान, स्वीट मार्ट, पेट्रोल पंप, रिक्षा, बस, टॅक्सी तसेच आठवडे बाजार असे सगळीकडेच दहा रुपयांचे नाणे स्वीकारले जात आहे.

दहा रुपयाचे नाणे हे नाकारतात

दहा रुपयांचे नाणे शहरात कोठेही नाकारले जात नाही. क्विचितप्रसंगी एखाद्या दुकानात नाणे नाकारण्याचे प्रकार घडतो. मात्र, तोही गैरसमजातून किंवा बातम्या तसेच सोशल मीडियातून मिळणाऱ्या चुकीच्या माहितीतून असे प्रकार होतात.

बँकांमध्येही स्वीकारतात नाणे

पुणे शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बँकां अथवा खासगी सहकारी बँकामध्ये दहा रुपयांचे नाणे घेतले जात आहे. कोणत्याही बँकात नाणे नाकारले जात नाही.

Web Title: 10 rupees coin Is there a ban on coins what is rbi order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.