३२० वंचित मुलींसाठी १० हजारांची शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:10 AM2021-09-03T04:10:41+5:302021-09-03T04:10:41+5:30
पुणे : राज्यातील वंचित मुलींना उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी आणि आर्थिक पाठबळ देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या अंतर्गत ...
पुणे : राज्यातील वंचित मुलींना उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी आणि आर्थिक पाठबळ देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या अंतर्गत सध्या १२ वीत शिक्षण घेत असलेल्या ३२० मुलींना शैक्षणिक खर्चासाठी १० हजार रुपये देण्यात येणार आहे.
अर्जदारांनी दहावी किंवा अकरावीच्या परीक्षेत किमान ६५ टक्के गुण मिळवले पाहिजेत आणि २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी सध्या १२ वीत प्रवेश घेतला असला पाहिजे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी अर्जदारांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ३ लाख ६० हजारापर्यंतच असावे, अशी अट आहे. विनती ऑर्गेनिक्स, संहिता कलेक्टिव गुड फाउंडेशन’ आणि ‘बडी फॉर स्टडी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ही शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.
शिष्यवृत्तीसााठी पुढील संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करायचा आहे - बारावीत शिकणाऱ्या मुली बडी फॉर स्टडीच्या https://www.buddy4study.com/page/vinati-organics-young-women-merit-scholarship. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे.