आरटीईच्या पहिल्या फेरीत १० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 09:58 PM2018-03-12T21:58:12+5:302018-03-12T22:06:20+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे दुपारी बारा वाजता आरटीई प्रवेशाची सोडत काढण्यात आली. आज यादी जाहीर होणार
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पुणे जिल्हयातून पहिल्या फेरीत १० हजार २२८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहे. प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांची यादी मंगळवारी संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाणार आहे, तसेच याबाबतचे मेसेजही पालकांना पाठविले जाणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे दुपारी बारा वाजता आरटीई प्रवेशाची सोडत काढण्यात आली. प्राथमिकच्या शिक्षण अधिकारी शैलजा दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लहान मुलांच्या हस्ते चिठठ्या काढण्यात आल्या. आरटीई प्रवेशासाठी ४२ हजार १०८ अर्ज आले आहेत. पुणे जिल्हयात प्रवेशासाठी ९३३ शाळांमधून एकूण १६ हजार ४२२ इतक्या जागा उपलब्ध आहेत, मात्र काही शाळेच्या प्रवेशासाठी पालकांचे अर्ज न आल्याने १० हजार २२८ प्रवेश पहिल्या फेरीत निश्चित करण्यात आले.
सोडतीसाठी ४ वेगवेगळया बाऊलमधून चिठठ्या काढण्यात आल्या. त्यानुसार चिठठयांमध्ये निघालेल्या आकडयांच्या ४ लाइन तयार करण्यात आल्या आहेत. संगणकामार्फत या आकडयांची घुसळण करून पहिल्या फेरीत १० हजार २२८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत.
चार बाऊलमधून प्रत्येकी १० आकडे काढण्यात आले. पहिल्या बाऊलमधून २, १, ८, ३, ०, ६, ४, ९, ७, ५ हे आकडे निघाले. दुसºया बाऊलमधून ५, ७, ३, ८, २, ०, ४, ९, ६, १ तिसºया बाऊलधून ९, २, ४, ०, ५, ७, १, ३, ६, ८ तर चौथ्या बाऊलमधून २, १, ३, ७, ६, ४, ०, ९, ८, ५ हे आकडे निघाले. ही सर्व आकडेवारी आरटीई प्रवेशाच्या केंद्रीय व्यवस्थापनाकडे पाठविली जाणार आहे. त्यानंतर या आकडयांची घुसळण करून संगणकामार्फत आरटीईचे प्रवेश निश्चित होणार आहे.
आरटीई प्रवेशासाठीच्या पहिल्या फेरीचे आॅनलाइन अर्ज भरण्यास १० फेब्रुवारीपासून सुरूवात झाली. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना यातून मोफत प्रवेश दिले जात आहेत. पहिली तसेच शिशू वर्गाच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा संपूर्ण खर्च मोफत असणार आहे. प्रत्येक शाळेमधून प्रत्येकी २५ टक्के प्रवेश यामाध्यमातून होणार आहेत. राज्यभरात आरटीईच्या राखीव कोटयांतर्गत ९ हजार शाळांमधून १ लाख २६ हजार जागा उपलब्ध आहेत.
अधिकारी लगेच गेल्याने पालकांचा उडाला गोंधळ
आरटीई सोडतीचे आकडे काढण्यात आल्यानंतर पालकांनी त्यांच्या शंका विचारण्यास सुरूवात केली. त्यांच्या काही प्रश्नांची त्रोटक उत्तरे अधिकाºयांनी दिली. मात्र त्यानंतर लगेच मिटींगला जायचे असल्याचे सांगून सोडत काढण्यासाठी आलेले अधिकारी व कर्मचारी बाहेर पडले. आरटीई प्रवेशासाठी काढण्यात आलेल्या या आकडयांचे पुढे काय होणार, यातून प्रवेश कसे निश्चित होणार याची नीटशी माहिती त्यांना मिळाली नाही. त्यामुळे पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. अधिकारी योग्य माहिती न देता निघून गेल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेने प्रवेश नाकारल्यास त्या शाळांविरूध्द कठोर कारवाई केली जाईल असे शिक्षण विभागाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. मागील वेळेस काही शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश मिळूनही त्यांनी तो दिला नसल्याच्या तक्रारी यावेळी पालकांनी केल्या.आज संकेतस्थळावर होणार विद्यार्थ्यांची नावे जाहीर
पुणे जिल्हयातील आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. त्याचबरोबर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना याबाबतचे मेसेजही पाठविले जाणार आहेत. त्यानंतर पालकांनी २४ मार्च पर्यंत संबंधित शाळेमध्ये जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करायचा आहे.आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेने प्रवेश नाकारल्यास त्या शाळांविरूध्द कठोर कारवाई केली जाईल असे शिक्षण विभागाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. मागील वेळेस काही शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश मिळूनही त्यांनी तो दिला नसल्याच्या तक्रारी यावेळी पालकांनी केल्या.