क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे महापालिकेला १० व्हेंटिलेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:10 AM2021-04-27T04:10:23+5:302021-04-27T04:10:23+5:30
बाणेर येथील महापालिकेच्या कोविड रुग्णालयाला ५ व्हेंटिलेटर व हाय फ्लो ऑक्सिजन डिव्हाईस सुपूर्त करण्यात आले. क्रेडाई पुणे मेट्रोचे सहसचिव ...
बाणेर येथील महापालिकेच्या कोविड रुग्णालयाला ५ व्हेंटिलेटर व हाय फ्लो ऑक्सिजन डिव्हाईस सुपूर्त करण्यात आले. क्रेडाई पुणे मेट्रोचे सहसचिव तेजराज पाटील, पुणे महापालिकेचे डॉ. घुगे या वेळी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड मधील थेरगाव येथील महापालिका कोविड रुग्णालयाला देखील ५ व्हेंटिलेटर व हाय फ्लो ऑक्सिजन डिव्हाईस देण्यात आले आहेत.
याशिवाय पिंपरीमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात खास पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या ३० खाटांच्या कक्षाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले. क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी. डी. पाटील आदी या वेळी उपस्थितीत होते. या कक्षासाठी क्रेडाई पुणे मेट्रो ५ व्हेंटिलेटर देणार असल्याची माहिती अनिल फरांदे यांनी दिली आहे.