१०० आरोपी, २७ आलिशान गाड्या, ६४ मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:12 AM2021-03-21T04:12:23+5:302021-03-21T04:12:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर कुख्यात गुंड गजानन मारणे व त्याच्या साथीदारांनी जंगी मिरवणुक काढली होती. ...

100 accused, 27 luxury cars, 64 mobiles | १०० आरोपी, २७ आलिशान गाड्या, ६४ मोबाईल

१०० आरोपी, २७ आलिशान गाड्या, ६४ मोबाईल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर कुख्यात गुंड गजानन मारणे व त्याच्या साथीदारांनी जंगी मिरवणुक काढली होती. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी बेकायदा जमाव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन गजानन मारणे याला अटक केली होती. या गुन्ह्यात कोथरुड पोलिसांनी आतापर्यंत १०० आरोपींना अटक केली. त्यांच्या २७ अलिशान गाड्या आणि ६४ मोबाईल जप्त केले आहेत.

गजानन मारणे व त्याच्या साथीदारांनी बेकायदा मिरवणुक काढत जमाव बंदीचा आदेशाचा भंग केला. तसेच हमराज मित्र मंडळाच्या गणपतीची आरती केली होती. याप्रकरणी १६ फेब्रुवारी रोजी दीडशे जणांवर गुन्हा दाखल केला होता. यामध्ये सुरुवातीला गजानन मारणे व त्याच्या ९ साथीदारांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. मात्र, त्यानंतर पोलिसांनी ड्रोन कॅमेर्‍याद्वारे मिरवणुकीचे चित्रीकरण तसेच रस्त्यावरील सर्व सीसीटीव्हीचे फुटेज तपासातून आतापर्यंत १०० आरोपींना निष्पन्न करीत त्यांना अटक केली. २७ गाडया व ६४ मोबाईल जप्त केले, अशी माहिती कोथरुडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम डांगे यांनी दिली. गजानन मारणे याच्यावर सध्या जिल्हाधिकार्‍यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

Web Title: 100 accused, 27 luxury cars, 64 mobiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.