पुणे महानगरपालिकेच्या १०० खाटांच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:15 AM2021-04-30T04:15:33+5:302021-04-30T04:15:33+5:30

पुणे: पुणे महानगरपालिकेने मार्केट यार्डमधील ईएसआयसी रुग्णालयात सुरु केलेल्या 100 खाटांच्या स्वतंत्र कोविड रुग्णालयाला महावितरणकडून 80 किलोवॅट क्षमतेची नवीन ...

100 beds of Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेच्या १०० खाटांच्या

पुणे महानगरपालिकेच्या १०० खाटांच्या

googlenewsNext

पुणे: पुणे महानगरपालिकेने मार्केट यार्डमधील ईएसआयसी रुग्णालयात सुरु केलेल्या 100 खाटांच्या स्वतंत्र कोविड रुग्णालयाला महावितरणकडून 80 किलोवॅट क्षमतेची नवीन वीजजोडणी तात्काळ कार्यान्वित करण्यात आली. महावितरण व महानगरपालिकेच्या संयुक्त सहकार्याने या कोविड रुग्णालयाचा स्वतंत्र वीजपुरवठा गुरुवारी दुपारी 3 वाजता सुरु झाला आहे.

मार्केटयार्डमधील ईएसआयसी रुग्णालयामध्ये 100 खाटांचे स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरु करण्याची कार्यवाही पुणे महानगरपालिकेकडून सुरु करण्यात आली होती. यामध्ये ऑक्सीजनच्या 40 खाटांचा समावेश आहे. या रुग्णालयाच्या वीजपुरवठ्यासाठी 80 किलोवॅट क्षमतेची नवीन वीजजोडणी आवश्यक होती. महानगरपालिकेकडून नवीन वीजजोडणीचा अर्ज आल्यानंतर महावितरणकडून मंजुरीची प्रक्रिया केली. आवश्यक पायाभूत वीजयंत्रणेची उभारणी पूर्ण झाल्यानंतर आज दुपारी कोविड रुग्णालयाला स्वतंत्र नवीन वीजजोडणीद्वारे वीजपुरवठा सुरु करण्यात आला.

Web Title: 100 beds of Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.