१०० कोटींची फसवणूक, पुण्याच्या कंपनीविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 09:37 IST2023-11-21T09:36:55+5:302023-11-21T09:37:18+5:30
ईडीकडून व्हीप्स समूहाची मालमत्ता जप्त

१०० कोटींची फसवणूक, पुण्याच्या कंपनीविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सामान्य गुंतवणूकदारांची तब्बल १०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुणेस्थित व्हीप्स या समूहाविरोधात मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचा दुबईस्थित मालक विनोद खुटे याच्यावर यापूर्वी देखील परदेशी विनिमय चलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान, याप्रकरणी ईडीने केलेल्या छापेमारीत २८ कोटी ६० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, विनोद खुटे या व्यावसायिकाने क्रिप्टो करन्सी, पेमेंट वॉलेट सर्व्हिस आणि परदेशी चलनाचे अवैध व्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यासाठी त्याने शेकडो गुंतवणूकदारांकडून भारतीय चलनात पैसे गोळा केले होते व गुंतवणूकदारांना प्रत्येक महिन्याला २ ते ३ टक्के परतावा देण्याचे आमिष दिले होते. विशेष म्हणजे त्याने अमेरिकी डॉलर या चलनामध्ये हा परतावा देण्याचे देखील आमिष दिले होते.