पुण्यातल्या ससून रुग्णालयाने गाठली म्युकोरमायकॉसिस चा शस्त्रक्रियांची शंभरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 11:12 AM2021-06-04T11:12:49+5:302021-06-04T11:15:40+5:30

अनेक शस्त्रक्रिया गुंतागुतीच्या

100 Mucormycosis surgeries performed at Sassoon Hospital in Pune | पुण्यातल्या ससून रुग्णालयाने गाठली म्युकोरमायकॉसिस चा शस्त्रक्रियांची शंभरी

पुण्यातल्या ससून रुग्णालयाने गाठली म्युकोरमायकॉसिस चा शस्त्रक्रियांची शंभरी

Next

ससुन सर्वोपचार रुग्णालयाने म्युकोरमायकॉसीसचा शस्त्रक्रियेची शंभरी गाठली आहे.पुण्याच्या ससुन सर्वोपचार रुग्णालयामध्ये म्यूकोरमायकॉसीसची शंभरावी शस्त्रक्रिया यशस्वी रित्या करण्यात आली आहे.कोरोना महामारी पाठोपाठ म्युकोरमायकॉसीस म्हणजेच काळी बुरशीचा त्रास आता रुग्णांना भेडसावत आहे.

हा आजार, बहुतांश कोविड १९ होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये आढळत आहे. कोविड आजाराच्या वेळी देण्यात आलेल्या स्टीरॉइड त्याच बरोबर, रुग्णाला असलेले मधुमेह, उच्चरक्त दाब, कर्करोग यासारखे इतर आजार आणि कमी प्रतिकार शक्ती असल्यास, या बुरशीचा सहजरित्या रुग्णांच्या नाकामधून शरिरामध्ये शिरकाव होतो . ही बुरशी पुढे जाऊन, डोळे व मेंदू मध्ये संसर्ग करते ज्यामुळे रुग्ण दृष्टी किंवा प्राण गमावू शकतो.

पुण्याच्या ससुन सर्वोपचार रुग्णाल्या मध्ये म्यूकोरमायकॉसीस ची महामारी सुरु झाल्यापासून, २०१ हून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.यात दररोज ७-८ नविन रुग्ण भरती होत आहेत.

या रूग्णांची ससुन रुग्णाल्यामध्ये म्युकोरमायकॉसीसची शंभरावी शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रिया मध्ये आता पर्यंत १०१ फेस व स्कलबेस ,२ क्रानियटोमी, २ कॅन्सर आणि म्युकोरमायकॉसीस चा केसेस यांचा समावेश होता.या व्यतिरीक्त11 रुग्णांच्या मेंदूच्या रक्त वाहिनी मध्ये बुरशीचा संसर्ग असल्याने शस्रक्रिया करण्यात आली आणि ४ रुग्णांच्या मेंदूमध्ये बुरशीमुळे पस झाल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली.

 

ह्या पैकी बहुतांश शस्त्रक्रिया शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत करण्यात आल्या. तसेच या आजाराच्या उपचारासाठी लागणऱ्या अंफोटरिसिन ची व्यवस्था डॉ. भारती दासवानी प्राध्यापक व MPJAY प्रभारी अधिकारी यांच्या तर्फे उत्तम रित्या करण्यात आली.या शस्त्रक्रियां साठी डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, ससुन सर्वोपचार रुग्णालय ,डॉ. अजय तावरे वैद्यकीय अधिक्षक व डॉ. विजय जाधव उपवैद्यकीय अधिक्षक यांचे अमूल्य सहयोग लाभले. ह्या शस्त्रक्रिया डॉ. समिर जोशी, प्राध्यापक व विभाग प्रमुख, कान नाक व घसा शास्त्र विभाग यांच्या नेतृत्वाखालि त्यांच्या चमू मध्ये असलेल्या डॉ. राहूल तेलंग सहयोगी प्राध्यापक, डॉ. संजयकुमार सोनावले सहयोगी प्राध्यापक, डॉ. अफशान शेख, सहाय्यक प्राध्यापक, डॉ. किरीट यथाटी सहाय्यक प्राध्यापक , डॉ. चेरी रॉय यांनी या शस्त्रक्रिया पार पाडल्या. 

या बुरशीचा संसर्ग डोळयांना झाल्यामुळे दृष्टी गमावलेल्या रुग्णांचे व्यवस्थापन नेत्रतज्ञ डॉ. संजीवनी आंबेकर प्राध्यापक व विभाग प्रमुख आणि डॉ. सतिश शितोळे यांच्या तर्फे करण्यात आले.

Web Title: 100 Mucormycosis surgeries performed at Sassoon Hospital in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.