डेंगीचे महिन्यात १०० नवे रुग्ण, तालुक्यात डासांच्या प्रादुर्भावात झापाट्याने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:19 AM2017-10-25T01:19:22+5:302017-10-25T01:19:31+5:30
राजगुरुनगर : खेड तालुक्यात डेंगीच्या आजाराची तीव्रता वेगाने वाढत असून, महिन्याभरात डेंगीचे तब्बल १०० अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच रोज नवीन डेंगीचे रुग्ण आढळतच आहे.
राजगुरुनगर : खेड तालुक्यात डेंगीच्या आजाराची तीव्रता वेगाने वाढत असून, महिन्याभरात डेंगीचे तब्बल १०० अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच रोज नवीन डेंगीचे रुग्ण आढळतच आहे. खेड तालुक्यात पाऊस तसेच वातावरणात सतत होणारा बदल, उष्णता त्यामुळे नागरिक आजारी पडत आहे. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखव करणे, हातपाय दुखणे असे विषमज्वर आजारांचे रुग्ण आढळत आहेत. डासांचा प्रादुर्भाव शहरात व तालुक्यात झपाट्याने वाढत असताना त्यांच्या नायनाटासाठी उपाययोजनाच करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे डासांच्या चाव्यामुळे डेंगी, मलेरिया आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे.
या महिन्यात खेड तालुका व शहरात डेंगीचे १०० आधिक रुग्ण सापडले आहेत. तर, या वर्षात डेंगीच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. राजगुरूनगर शहराच्या मध्यवर्ती भागांसह परिसरामध्ये या आजाराचे रुग्ण सापडू लागले आहे. डासांपासून संरक्षण, पाण्याची डबकी साचू देऊ नका, घरात साठवलेले पाणी झाकून ठेवा, घरातील टाक्यांना घट्ट झाकण लावा, स्वच्छता ठेवा, सामान हलते ठेवा, मच्छरदाणी वापरावी, रस्त्यावर, कॉलनीत डबकी, घाण साचू न देणे कॉलनी, सोसायट्यांमध्ये स्वच्छता हवी. सार्वजनिक टाकी सफाई आवश्यक, नाले-नाल्यांशेजारी सतत औषध फवारणी हवी. कचराकुंड्यांची नियमित सफाई आवश्यक करावी, असे आवाहन राजगुरुनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उदय पवार यांंनी केले आहे.