ज्ञानगंगा महाविद्यालयाचा १२ वीचा १०० टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:13 AM2021-08-15T04:13:24+5:302021-08-15T04:13:24+5:30
साक्षी मुरवदे हिने ९६.१६ टक्के मिळवून द्वितीय क्रमांक, प्रतीक्षा गवईला ९४ .१६ टक्के गुणासह तृतीय क्रमांक, सायली फलके ९३. ...
साक्षी मुरवदे हिने ९६.१६ टक्के मिळवून द्वितीय क्रमांक, प्रतीक्षा गवईला ९४ .१६ टक्के गुणासह तृतीय क्रमांक, सायली फलके ९३. ८३ टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक व अपेक्षा दौंडकर ९३. १६ टक्के गुणासह पाचवा क्रमांक पटविला आहे.
ज्ञानगंगा काॅलेजमधील कॉमर्स विभागातील कोमल बोथरा हिने ९१ टक्के मिळवून सर्वप्रथम, तर ऋतुजा चौधरी ने ८९. ८३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर दिनेश बेंद्रेला ८९ . ५० टक्के गुणासह तृतीय क्रमांक मिळाला आहे.
ज्ञानगंगाच्या सायन्स विभागातील साक्षी वाघ हिने १०० पैकी फिजिक्स विषयात ९९ केमिस्ट्रि विषयात ९९, बायोलॉजी विषयात ९९ व गणितामध्ये ९८ गुण मिळवले आहेत.
ज्ञानगंगातील १२ वीच्या विद्यार्थ्यांनी सायन्स विभागातील ९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यापेक्षा अधिक गुण, तर ३७ विद्यार्थ्र्यांनी ८० टक्के व ४१ विद्यार्थ्यांनी ७० टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. कॉमर्स विभागातून देखील दोन विद्यार्थ्यांनी ९० टक्के, २० विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यापेक्षा अधिक गुण व १५ विद्यार्थ्यांनी ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण पटकविले आहेत. त्यामुळे ज्ञानगंगा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे व व्यवस्थापनाचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट यशाबद्दल गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. राजेराम घावटे सर यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले. आज ज्ञानगंगाच्या सर्वच विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याबद्दल समाजातील सर्वच घटकांचे प्रा. डॉ. नितीन घावटे यांनी संस्थेच्या वतीने आभार मानले आहेत.