कर्जरोख्यांवर 100 टक्के परतावा
By admin | Published: November 26, 2014 12:02 AM2014-11-26T00:02:19+5:302014-11-26T00:02:19+5:30
कृष्णा खोरे विकास महामंडळाने 1996मध्ये खुल्या बाजारातून भागभांडवल उभारण्यासाठी विक्री केलेल्या कर्जरोख्यांचा 1क्क् टक्के परतावा करण्यात आला
Next
पुणो : कृष्णा खोरे विकास महामंडळाने 1996मध्ये खुल्या बाजारातून भागभांडवल उभारण्यासाठी विक्री केलेल्या कर्जरोख्यांचा 1क्क् टक्के परतावा करण्यात आला असून, या कर्जरोख्यांपोटी महामंडळाला व्याजाची रक्कम देता यावी, यासाठी राज्य शासनाने महामंडळाला गेल्या 18 वर्षामध्ये एकूण 5,278 कोटी 69 लाख रुपयांचे अनुदान दिले आहे.
कृष्णा खो:यातील विविध प्रकल्पांच्या कामांसाठी कर्जरोख्यांची मोठय़ा प्रमाणात विक्री करण्यात आली. वेगवेगळय़ा रकमांच्या कर्जरोख्यांसाठी आकर्षक व्याजदराचे आश्वासन महामंडळाने दिले होते. हजारो ठेवीदारांनी हे कर्जरोखे खरेदी केले होते. गेल्या 18 वर्षामध्ये याद्वारे उभारलेल्या संपूर्ण रकमेची व्याजासह परतफेड करण्यात आली आहे, अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक शिवाजी उपासे यांनी दिली.
या कर्जरोख्यांवरील व्याजासाठी शासनाकडून दर वर्षी महामंडळाला अनुदान दिले जात होते. 1996-97 या पहिल्याच वर्षी 975 कोटी रुपये महामंडळाला मिळाले. 98-99मध्ये 99क्, तर 99-2क्क्क्मध्ये 1,272 कोटी रुपयांची उभारणी करता आली. 2क्क्1-2 या वर्षात 1,429 कोटी रुपये तर नंतरच्या 3 आर्थिक वर्षामध्ये अनुक्रमे 5क्5, 287 आणि 412 कोटी रुपये महामंडळाला प्राप्त झाले. एकूण 7 वर्षात 5,278 कोटी 69 लाख रुपयांचा निधी मिळाला.
4शासनाने या कर्जरोख्यांच्या व्याजासाठी दर वर्षी काही प्रमाणात तरतूद केली होती. 18 वर्षामध्ये 5,278 कोटी 69 लाख रुपयांचे अनुदान महामंडळाला प्रदान करण्यात आले. त्यामुळे महामंडळाला मुदत संपलेल्या कर्जरोख्यांवरील मुद्दल व व्याज परत करता आले.
4बहुतांश रोखेधारकांचे पैसे महामंडळाने अदा केले आहेत.मात्र, काही संस्थांनी कर्जरोखे विकत घेतले होते आणि ज्या संस्था विसर्जित झाल्या अशा संस्थांचे आणि बेवारस व्यक्तींच्या कर्जरोख्यांचे देणो शिल्लक आहे. ज्या संस्था विसर्जित झाल्या आहेत अशा संस्थांच्या संबंधितांना या संदर्भात महामंडळाने माहिती कळविली आहे, असेही उपासे यांनी नमूद केले.