१०० शिक्षक अतिरिक्त?

By admin | Published: August 29, 2016 03:21 AM2016-08-29T03:21:57+5:302016-08-29T03:21:57+5:30

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २७६ प्राथमिक शाळांपैकी २४ केंद्रांतील २ ते १० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या ५७ शाळा आहेत

100 teacher extra? | १०० शिक्षक अतिरिक्त?

१०० शिक्षक अतिरिक्त?

Next

भोर : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २७६ प्राथमिक शाळांपैकी २४ केंद्रांतील २ ते १० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या ५७ शाळा आहेत. प्रत्येक शाळेवर २ पासून १०पर्यंत असा एकूण ४५६ पट आहे. प्रत्येक शाळांवर दोनप्रमाणे एकूण ११४ शिक्षक कार्यरत आहेत.
वीसगाव, हिर्डोशी व आंबवडे, वेळवंड व भुतोंडे खोऱ्यात १०पेक्षा कमी शाळापट असणाऱ्या सर्वाधिक शाळा आहेत. या शाळा शासन बंद करण्याच्या विचारात असून यामुळे सुमारे १००पेक्षा अधिक शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे.
भोर तालुक्यातील २४ केंद्रांर्तगत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या १० पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळांची पटसंख्या खालीलप्रमाणे :
माळवाडी रायरेश्वर (पट २), साळवीवाडी (पट २), शेरताटी धनावडेवाडी (३), वारवंड (३), केशवनगर (४), नांगरेवाडी (४), चहाणवाडी (४), म्हस्केकिंद्रे वस्ती (४), करंजगाव (४), मानटवस्ती (४), घेवडेश्वर (४), मिरकुटवाडी (४), जयतपाड (४), भांड्रवली डेरे (४), उदयनखानवाडी (५), ब्राम्हणघर (५), केंढाळकर वस्ती (५), वरपेवाडी
(५), सणसवाडी (५), टोंगवाडी पसुरे (५), सणसवाडी शिंद (५), वाघमाची
बोपे (५), बुदगुेडवाडी भाबवडी (६), जेधेवाडी (६), पोळवाडी (६),पाचलिंगे (६), निगडे खेंबा (६), विरवाडी (६), जांभुळवाडी (६), हिर्डाेशी (६), तांभाड नं. १ (७), देवघरे आवाड (७), करंजेवाडी (७), कुंड (७), पांगारी आश्रम (७),
देऊळवाडी (८), तांभाड २ (८), धारांबे (८), पऱ्हर बु. (८), रायरेश्वर (८), राजीवडी (८), उंबार्डे (८), धनगरवस्ती पसुरे (८), सुतारवाडीमळे (८), बुरुडमाळ (८), अनंतनगर (९), हातवे बु. (९), कारुंगण (९), वेणुपुरी (९), खालचे गाव कोंढरी (९), चांदावणे (९), मानकरवाडी (१०), राऊतवाडी (१०), म्हाकोशी (१०), घनगरवस्ती (१०), तळजाईवाडी (१०) अशा एकूण ५३ शाळा असून, ३४९ विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तब्बल ११४ शिक्षक मंजूर आहेत. त्यातील बदल्यांमुळे १०६ शिक्षक कार्यरत आहेत.
दुर्गम डोंगरी भागातील शाळांना रस्ता नाही.
याशिवाय अनेक अडचणी भेडसावत असल्याने
निकषानुसार सदरच्या शाळांना
या अटीतून वगळले जाणार
असल्याची चर्चा आहे.
(वार्ताहर)

Web Title: 100 teacher extra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.