एक महिन्यात उभारता येऊ शकतो १०० टनाचा ऑक्सिजन प्लॅन्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:10 AM2021-05-23T04:10:58+5:302021-05-23T04:10:58+5:30
रुग्णांची गरज भागून तो उद्योगांनाही पुरविता येईल, अनेक ठिकाणी सरकारी जागा पडून आहेत. सरकारचाच उपक्रम असल्याने त्यास विविध परवानग्या ...
रुग्णांची गरज भागून तो उद्योगांनाही पुरविता येईल, अनेक ठिकाणी
सरकारी जागा पडून आहेत. सरकारचाच उपक्रम असल्याने त्यास विविध
परवानग्या काढण्याकरिता वेळ जाणार नाही. त्यासाठी लागणारा कच्चा
माल, तज्ज्ञ व कामगार पुणे परिसरात उपलब्ध आहेत. दररोज १०० टन
ऑक्सिजन उत्पादन करू शकणारा प्लॅन्ट एक महिन्यात तयार होऊ
शकतो असे यावेळी बोलताना उद्योजक कार्तिक गोवर्धन यांनी सांगितले.
राज्यात दररोज १२०० ते १४०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होते,
त्यातील ४०० मेट्रिक टन उत्पादन पुणे जिल्ह्यातील आहे, राज्यातील ऑक्सिजन
उत्पादन दररोज ३०० मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे.
उद्योगांकडून एमआयडीसी व महापालिकेला मोठ्या प्रमाणावर टॅक्स मिळतो.
सध्या ऑक्सिजन प्लॅन्ट कंपन्यांना ऑक्सिजन फक्त्त वैद्यकीय कारणासाठी
देण्यात यावा, असा आदेश असल्याने औद्योगिक कारणासाठी ऑक्सिजन देण्यात
येत नाही. परिणामी स्टीलच्या किमती ३० ते ४० टक्क्याने वाढलेल्या आहेत.
ऑक्सिजनशिवाय स्टील प्लॅन्ट उत्पादन करू शकत नाही. विविध उद्योगांमधे
वैद्यकीय उपकरणे ही बनविली जातात पण ऑक्सिजन मिळत नसल्याने ते उद्योग
काही अंशी चालू आहेत, परिणामी उपकरणांची मागणी वाढल्याने किमती वाढलेल्या
आहेत. विविध कंपन्यांना नट, बोल्ट, खिळे, पेंट व टुल्स लागतात पण हार्डवेअर दुकाने
बंद असल्याने ते मिळत नाहीत. आठवड्यातून एकदोन दिवस तरी ठराविक वेळी
ही दुकाने चालू ठेवण्याची परवानगी मिळावी अशी उद्योजकांची मागणी आहे.
ऑक्सिजन नाही, त्यामुळे स्टील नाही ते नसल्याने आम्हाला खूप अडचण
जाणवत आहे. प्रॉडक्शन बंद आहे कामगार बसून आहेत. महिन्याचा निश्चित खर्च
करावाच लागतो याचा आम्हाला तोटा होत आहे शासनाने याकडे लक्ष द्यावे. -
प्रसाद माळगावकर,उद्योजक