पुणे शहरासह जिल्ह्यात १ हजार कोटींची वीजबिल थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:18 AM2021-02-06T04:18:51+5:302021-02-06T04:18:51+5:30
पुणे : पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहक यांची थकबाकी आता तब्बल १ ...
पुणे : पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहक यांची थकबाकी आता तब्बल १ हजार ८१ कोटी ४१ लाख रुपयांवर गेली आहे.
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात बिलिंग सायकलमुळे इतरवेळी दरमहा ७० ते ८० कोटी रुपयांची थकबाकी असते. मात्र हीच थकबाकी कोरोना आपत्तीच्या १० महिन्यांच्या कालावधीत ८०३ कोटींनी वाढली आहे.
पुणे जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये सुमारे ३६ लाख ९० हजार ग्राहक आहेत. मार्च २०२० मध्ये ८ लाख ९४ वीजग्राहकांकडे २७८ कोटींची थकबाकी होती. ही थकबाकी वसूल करण्यापूर्वीच मार्चमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरु झाला.
सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये घरगुती, वाणिज्यिक औद्योगिक वर्गवारीतील १३ लाख ८६ हजार वीजग्राहकांकडे तब्बल 1 हजार ८१ कोटी ४१ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यात सर्वाधिक घरगुती ११ लाख ५६ हजार ७५० ग्राहकांकडे ६३५ कोटी ४९ लाख, वाणिज्यिक १ लाख ९४ हजार २५० ग्राहकांकडे २९५ कोटी ५५ लाख तर औद्योगिक २७ हजार ९७० ग्राहकांकडे १५० कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी आहे.
करण्यात आले आहे.
--------------------------
राज्याच्या कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने कृषिपंपधारकांसह 12 लाख 46 हजार 455 कृषी वीजग्राहकांना वीजबिल कोरे करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या ग्राहकांकडे सद्यस्थितीत 10824 कोटी 56 लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे एकूण 2638 कोटी 51 लाख रुपये महावितरणकडून माफ करण्यात आले आहे. या कृषी ग्राहकांनी उरलेल्या 8186 कोटींच्या मूळ थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित 50 टक्के म्हणजे 4093 कोटींची रक्कम माफ करण्यात येणार आहे. सोबतच त्यांचे थकीत वीजबिल देखील कोरे होणार आहे.
कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या तसेच वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकी, व्याज व विलंब आकारात सवलत देणारे स्वतंत्र धोरण ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून नुकतेच जाहीर झाले आहे.