विनायक चतुर्थीनिमित्त महागणपतीला १००१ संत्र्यांचे नैवेद्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:11 AM2021-05-16T04:11:46+5:302021-05-16T04:11:46+5:30
श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने विनायकी चतुर्थीच्या निमित्ताने पहाटे ५ वाजता अभिषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली. देवस्थानच्या ...
श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने विनायकी चतुर्थीच्या निमित्ताने पहाटे ५ वाजता अभिषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली. देवस्थानच्या वतीने दुपारी १२ वाजता महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. विनायकी चतुर्थीनिमित्ताने
प्रसिद्ध उद्योजक सबाजी पांडुरंग नवले यांच्या वतीने १००१ संत्र्यांचा नैवेद्य अर्पण करून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. तसेच प्रगतिशील शेतकरी ह.भ.प. नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांच्या वतीने विनायकी चतुर्थीचे निमित्ताने श्री महागणपती समोर नैवेद्य ठेवण्यासाठी ६५ हजार रुपये किमतीचे स्टीलचे रेलिंग देवस्थान ट्रस्टला भेट देण्यात आले.
या वेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रा. नारायण पाचुंदकर, नानासाहेब पाचुंदकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे,युवा उद्योजक माऊली पाचुंदकर, सचिन दुंडे, निलेश नवले, हिशोबणीस संतोष रणपिसे ,पुजारी मकरंद कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी व कर्मचारी उपस्थित होते
--
१५ रांजणगाव गणपती महागणपती संत्री
फोटो:रांजणगाव गणपती येथील श्री महागणपतीला फुलांची व संत्र्यांची केलेली आरास.