दत्तमहाराजांना १०१ किलो तिळगूळ, हलव्याचे दागिने व अंगरख्याचा महानैवेद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:09 AM2021-01-15T04:09:35+5:302021-01-15T04:09:35+5:30

पुणे : हलव्याचा नववर्तुळाकार हार, मुकुट, कंबरपट्टा, काजू, बदाम, सुके अंजीर, किवी, अननस इत्यादी सुका मेव्याने दत्तमहाराजांचा अंगरखा सजला ...

101 kg of sesame seeds, moving ornaments and tunic offered to Datta Maharaj | दत्तमहाराजांना १०१ किलो तिळगूळ, हलव्याचे दागिने व अंगरख्याचा महानैवेद्य

दत्तमहाराजांना १०१ किलो तिळगूळ, हलव्याचे दागिने व अंगरख्याचा महानैवेद्य

Next

पुणे : हलव्याचा नववर्तुळाकार हार, मुकुट, कंबरपट्टा, काजू, बदाम, सुके अंजीर, किवी, अननस इत्यादी सुका मेव्याने दत्तमहाराजांचा अंगरखा सजला होता. तिळगूळ, गूळपोळी, तिळवडी, तिळपापडी, गुळाच्या ढेपी व गुळाच्या मोदकांच्या तोरणांनी सजलेले दत्तमंदिर पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.

मकरसंक्रांतीनिमित्त कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमहाराजांना १०१ किलो गूळ, तिळगूळ आणि हलव्याच्या दागिन्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. सजावटीतील पदार्थ अनाथालय व वृद्धाश्रमांना देण्यात येणार आहेत.

या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागीरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, खजिनदार बी. एम. गायकवाड, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, उप उत्सव प्रमुख नंदकुमार सुतार, विश्वस्त अंकुश काकडे, अ‍ॅड. एन. डी. पाटील, उल्हास कदम, चंद्रशेखर हलवाई यांसह भाविक उपस्थित होते. सुभाष सरपाले व सहकाऱ्यांनी ही आरास साकारली.

अ‍ॅड. शिवराज कदम जहागीरदार म्हणाले, ''मकर संक्रातीनिमित्त यंदा सुकामेव्याचा अंगरखा हे विशेष आकर्षण होते. सुमारे ६० किलो गूळ, ४५ किलो रंगीत काटेरी हलवा, तीळ, गूळपोळी, तिळवडी, पापडी, मोदक, गुळाच्या ढेपी वापरून ही आरास केली. याशिवाय रंगीबेरंगी पतंगांची व फुलांची सजावट देखील मंदिरात करण्यात आली.''

Web Title: 101 kg of sesame seeds, moving ornaments and tunic offered to Datta Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.