१०१ टँकरने जिल्ह्यात पाणीपुरवठा
By admin | Published: July 25, 2016 02:12 AM2016-07-25T02:12:35+5:302016-07-25T02:12:35+5:30
जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडूनही जिल्ह्यातील जवळपास ५९ गावे आणि ६२४ वाड्या-वस्त्यांवरील २ लाख ४५ हजार ५३४ ग्रामस्थांना जवळपास १०१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे
पुणे : जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडूनही जिल्ह्यातील जवळपास ५९ गावे आणि ६२४ वाड्या-वस्त्यांवरील २ लाख ४५ हजार ५३४ ग्रामस्थांना जवळपास १०१ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यात बारामतीत सर्वाधिक ३३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने अनके गावातील टँकर बंद करण्यात आले होते. मात्र, असे असतानाही काही भागात पावसाने दडी मारल्याने अजूनही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
पुरंदर तालुक्यात १८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर इंदापूर तालुक्यात १३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. आंबेगाव तालुक्यात ३, शिरूर तालुक्यात ३, जुन्नर तालुक्यात २, तर खेड तालुक्यात एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. (प्रतिनिधी)