पुण्यातील केसरीवाड्यात 'लोकमान्य टिळकांचा' १०२ वर्षांपूर्वींचा पूर्णाकृती पुतळा विराजमान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 07:09 PM2021-07-23T19:09:04+5:302021-07-23T19:15:48+5:30
मुंबईत १९१९ मध्ये साक्षात लोकमान्यांना समोर बसून झाली पुतळ्याची निर्मित्ती
पुणे : लोकमान्य टिळकांची जयंती आणि गुरूपोर्णिमा असा योग साधत साक्षात टिळकांसमोर बसून तयार केलेला त्यांचा पूणार्कृती पुतळा केसरीवाड्यातील टिळक अभ्यासिकेत शुक्रवारी विराजमान झाला. आरामखुर्चीत बसलेला आणि हातात वर्तमानपत्र घेतलेल्या अविर्भावातील हा पुतळा पाहिल्यानंतर साक्षात टिळकच बसल्याचा भास होतो. इतका हुबेहुब हा पुतळा साकार करण्यात आला आहे. मुुंबईतील सरदार भवनात मूर्तिकार कै. केशव लेले यांनी १०२
वषार्पूर्वी म्हणजे १९१९ मध्ये हा पुतळा साकार केला होता, हे त्यातील विशेष!
या पूर्णाकृती पुतळ्याविषयी आमदार मुक्ता टिळक, शैलेश टिळक, शिल्पकार केशव लेले यांचे चिरंजीव यशवंतराव लेले, त्यांची कन्या डॉ. चित्रा लेले, शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी कुणाल टिळक आणि चैत्राली टिळक आदी उपस्थित होते.
हा पुतळा साधासुधा नाही तर जुलै १९१९ मध्ये मुंबईतील सरदार भवन येथे साक्षात लोकमान्य टिळकांच्या समोर बसून बनवलेला त्यांचा एकमेव पूृर्णाकृती पुतळा आहे. मूर्तिकार केशव लेले यांनी हा प्लँस्टर ऑफ पँरिसचा पुतळा साकार केला आहे. पुढील ८० वर्षे तो दादर येथे त्यांचे पुत्र यशवंत लेले यांच्या निवासस्थानी होता. त्यानंतर १९१९ मध्ये पुण्यातील महात्मा सोसायटी येथे वास्तव्य करणारी त्यांची नात डॉ. चित्रा लेले यांच्या घरी पुतळा हलविण्यात आला होता. तो चांगल्या ठिकाणी ठेवण्यात यावा अशी लेले कुटुंबियांची इच्छा होती, तेव्हा लोकमान्यांचे निवासस्थान
असलेल्या वास्तुचे नूतनीकरण होईल तेव्हा हा पुतळा तेथे स्थापित करू असे त्यांना सांगितले होते. आज गुरूपौर्णिमा आणि टिळक जयंतीच्या दिवशी पुणार्कृती पुतळा अभ्यासिकेत विराजमान झाला आहे. आम्ही लेले कुटुंबियांचे ऋणी असल्याचे शैलेश टिळक यांनी सांगितले.
हा पुतळा पुणे शहराची शान
लोकमान्य टिळक हे आजवर त्यांच्या फोटोच्या स्वरूपात सगळ्यांसमोर होते. मात्र, ते हयात असताना त्यांना समोर बसवून प्रत्यक्षात साकारलेला हा पुतळा असल्याने त्याचे जास्त महत्व आहे. लोकमान्य टिळकांचे फोटो काढणे तत्कालीन छायाचित्रकारांसाठी आव्हानात्मक होते. त्यात शिल्पकारासाठी पुतळा साकारणे ही तर कसोटीच होती. लेले कुटुंबियांनी पुतळा जपला आणि त्यांच्या मार्फत आज तो टिळकांच्या निवासस्थानी बसविला. हा पुतळा म्हणजे
पुणे शहराची शान आहे. असे मुक्ता टिळक यांनी सांगितले.