१०५ वर्षांचे डॉ बळवंत घाटपांडे यांचे निधन, बघा अखेरची दुर्मिळ मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 03:25 PM2020-01-22T15:25:26+5:302020-01-22T15:25:46+5:30

१०५ वर्षांचे आणि अखेरच्या दिवसापर्यंत कार्यरत असणाऱ्या डॉ बळवंत पंढरीनाथ घाटपांडे यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार या सूत्रीच्या आधारावर ते शेवटपर्यंत निरोगी आणि स्वावलंबी आयुष्य जगत होते.

105-year-old Dr Balwant Ghatpande dies, see last rare interview | १०५ वर्षांचे डॉ बळवंत घाटपांडे यांचे निधन, बघा अखेरची दुर्मिळ मुलाखत

१०५ वर्षांचे डॉ बळवंत घाटपांडे यांचे निधन, बघा अखेरची दुर्मिळ मुलाखत

googlenewsNext

पुणे :१०५ वर्षांचे आणि अखेरच्या दिवसापर्यंत कार्यरत असणाऱ्या डॉ बळवंत पंढरीनाथ घाटपांडे यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार या सूत्रीच्या आधारावर ते शेवटपर्यंत निरोगी आणि स्वावलंबी आयुष्य जगत होते. शतकाचा बदल अनुभलेले डॉ घाटपांडे शेवटच्या दिवसापर्यंत दवाखान्यात नियमित येऊन रुग्णांची तपासणी करत. कोणच्याही मदतीशिवाय चालणारी त्यांची ही दिनचर्या विशेष होती. 

घाटपांडे यांचा जन्म जुन्नरजवळील आळे गावातला. लहानपणी डॉक्टर बनण्याचा निश्चय केल्यावर त्यांनी तो प्रचंड चिकाटीने अमलात आणला. त्यात तीनवेळा अपयश आल्यावरही त्यांनी ऍडमिशन मिळवली आणि मागील ८२ वर्षे त्यांचीरुग्णसेवा अविरतपणे केली. नव्या काळातले तंत्रज्ञान आत्मसात करण्यासोबत जुन्याचा ऋणानुबंधही त्यांनी तोडला नाही . काहीही झालं तरी रोज अर्धा तास व्यायाम, सूर्यनमस्कार, कवायत करण्यास ते विसरले नाहीत. त्याशिवाय साधे, सात्विक जेवण घेताना अर्धा लिटर दुधही ते प्यायचे. घाटपांडे यांना तीन मुले असून तिघेही वैद्यकीय क्षेत्रातच आहेत. घाटपांडे यांची पदवीही वेगळी असून ती एल. सी. पी. एस. अशी होती. याचे पूर्ण रूप लायसन्स इन मेडिकल प्रॅक्टिस अँड सर्जरी असल्याचे ते सांगायचे. 

त्यापूर्वी काही महिने लोकमतने त्यांच्याशी बातचीत केली होती. तेव्हाच्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, ' ''गेल्या १००वर्षात समाज घडलाही आणि बिघडालाही. आता आजार वाढले तशा डॉक्टरांच्या शुल्कातही वाढ झाली आहे. मात्र रुग्णांना बर करायला नवनवीन तंत्रज्ञान आल्यामुळे जगणं सोपं झालं आहे. समाजात मात्र पूर्वी जो सलोखा, एकमेकांविषयीचे प्रेम, आदर, जिव्हाळा होता तो आता लोप पावला आहे. त्यामुळे आपण काही गोष्टीत तरी जुने ते सोने म्हणून नाती जपायला हवीत''

Web Title: 105-year-old Dr Balwant Ghatpande dies, see last rare interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.