Corona News Pune: शहरात गुरूवारी १०७ जण बरे होऊन सुखरूप घरी; १२९ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 07:21 PM2021-10-07T19:21:12+5:302021-10-07T19:21:19+5:30
आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ५६२ संशयितांची तपासणी करण्यात आली
पुणे: शहरात गुरूवारी १२९ कोरोनाबाधित आढळून आले असून, १०७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ५६२ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १.७० टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्ण संख्या १ हजार ५८३ सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ५ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही १८४ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २२९ इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३४ लाख १७ हजार ३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख २ हजार १०१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ९१ हजार ४७२ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार ४६ जणांचा मृत्यू झाला आहे.