Jejuri | जेजुरी गडाच्या विकासाला १०९ कोटींचा ‘भंडारा’; जीर्णोद्धारामुळे लौकिकात भर पडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 01:20 PM2023-03-11T13:20:31+5:302023-03-11T13:25:01+5:30

कंत्राट प्रक्रियेला सुरुवात....

109 crore for the development of Jejuri Fort; Restoration will add to the reputation | Jejuri | जेजुरी गडाच्या विकासाला १०९ कोटींचा ‘भंडारा’; जीर्णोद्धारामुळे लौकिकात भर पडणार

Jejuri | जेजुरी गडाच्या विकासाला १०९ कोटींचा ‘भंडारा’; जीर्णोद्धारामुळे लौकिकात भर पडणार

googlenewsNext

पुणे :जेजुरी गडाचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून पुनर्विकास सुरू झाला आहे. यासाठी राज्य सरकारने १०९ कोटींची निधी मंजूर केला असून येत्या पंधरवड्यात त्यासाठी कार्यादेश निघण्याची शक्यता आहे. विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात गडपायथा व शहराच्या विकासाचे नियोजन करण्यात येत आहे. गडावर पूर्वी सुमारे दीडशे दीपमाळा होत्या. कालौघात त्या नामशेष झाल्या. त्यातील अधिकाधिक दीपमाळांचे संवर्धन या पहिल्या टप्प्यात होणार आहे. या जीर्णोद्धारामुळे मंदिराच्या लौकिकात भर पडणार आहे.

जेजुरी गडावरील मंदिराच्या विकासाचे तसेच संवर्धनाचे काम यात होणार आहे. मंदिराचा गडावरील परिसर १ हजार २४० चौरस मीटर असून पहिल्या टप्प्यातील कामात मंदिराचे संवर्धन आहे त्याच स्थितीत केले जाणार आहे. त्यासाठी १७ कोटींचे कंत्राट जाहीर करण्यात आले आहे. गडाचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व लक्षात घेता हे काम राज्य पुरातत्त्व विभागामार्फत केले जाणार आहे. याच कामासाठीचे दुसरे १८ कोटींचे कंत्राटही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

मंदिराचे काम हे मुख्यत्वे दगडात केलेले आहे. त्यामुळे जीर्ण झालेले दगड बदलण्यात येणार आहेत. तर सुस्थितीत असलेल्या दगडांना पॉलिश करण्यात येणार आहे. गडावर पूर्वी दीडशे दीपमाळा होत्या. या सर्व दीपमाळा आताच पुनर्स्थापित करणे शक्य नसले तरी त्यातील काही दीपमाळा पुन्हा उभारल्या जाणार आहेत. सध्याच्या दीपमाळांचे संवर्धन दगड बदलून किंवा पॉलिश करून केले जाणार आहे. हे काम मुख्यत्वे चुन्यात केले जाणार आहे.

मंदिर व्यवस्थापनाकडून तात्पुरती डागडुजी करण्यात येते. ती परिस्थितीनुसार असली तरी अभ्यासपूर्ण नसते. त्यामुळे अशा डागडुजीला आता नवे स्वरुप मिळणार आहे.

मंदिर संवर्धनाचा पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यात शहराचा विकास, रस्ते, पाणी, निवासी व्यवस्था याचा आराखडा तयार केला जात आहे. लवकरच त्याला अंतिम स्वरुप देण्यात येईल.

- किरण इंदलकर, जिल्हा नियोजन अधिकारी, पुणे

Web Title: 109 crore for the development of Jejuri Fort; Restoration will add to the reputation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.