10th, 12th Exam Schedule Announced: दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

By प्रशांत बिडवे | Published: November 21, 2024 02:02 PM2024-11-21T14:02:34+5:302024-11-21T14:03:11+5:30

बारावीची परीक्षा दि. ११ तर दहावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी सुरू हाेणार

10th, 12th exam schedule announced in maharashtra | 10th, 12th Exam Schedule Announced: दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

10th, 12th Exam Schedule Announced: दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुणे: राज्य मंडळातर्फे येत्या फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची परीक्षा दि. ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान तर दहावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत हाेणार आहेत अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपुर,छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोलहापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची सर्वसाधारण, व्दिलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा दि. ११ फेब्रुवारी राेजी सुरू हाेणार आहे तर शेवटचा पेपर १८ मार्च राेजी हाेणार आहे. यासह प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा दि. २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत हाेणार आहे.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १०वी ) परीक्षा शुकवार, दि. २१ फेब्रुवारी सुरू हाेणार असून दि. १७ मार्च राेजी संपणार आहे. त्यानंतर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि.३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत हाेणार आहेत.

सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध

दहावी बारावी परीक्षांचे दिनांक, विषय याबाबत सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

समाज माध्यमांवर प्रसारित वेळापत्रकावर विश्वास ठेउ नका

राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपातील वेळापत्रक अंतिम असेल त्यावरून विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री करून घेत परीक्षेस उपस्थित रहावे. इतर संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून प्रसारित झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. याची नोंद घ्यावी. असेही कुलाळ यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: 10th, 12th exam schedule announced in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.