दहावीच्या निकालाची साईट क्रॅश! एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 02:18 PM2021-07-16T14:18:37+5:302021-07-16T14:28:01+5:30

पंधरा ते वीस मिनिटांमध्ये साइट पूर्ववत सुरू होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले

10th result site crash! Many students visit the website at the same time to see the results | दहावीच्या निकालाची साईट क्रॅश! एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट

दहावीच्या निकालाची साईट क्रॅश! एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट

Next
ठळक मुद्देकोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्याचे घोषित केले होते. परंतु,दुपारीचे २ वाजले तरी अनेक विद्यार्थ्यांना निकालच पाहता आला नाही. एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट दिली.परिणामी साईट क्रॅश झाली. 

त्यामुळे निकाल पाहता येत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांकडून केल्या जात आहेत. याबाबत राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता; येत्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये साइट पूर्ववत सुरू होईल.त्यांनतर सर्व विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल, असे त्यांनी सांगितले.

दरवर्षी एमकेसीएल सह इतर संकेतस्थळ निकाल पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात. त्याचप्रमाणे मोबाइलवर एसएमच्या माध्यमातून निकाल पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. परंतु यंदा केवळ एकच संकेतस्थळ निकाल पाहण्यासाठी दिले होते. राज्यतील १६ लाखाहून अधिक  विद्यार्थ्यांनी या संकेतस्थलळा भेट दिल्याने त्यावर ताण आला. 

राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल  विद्यार्थ्यांसाठी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. राज्याचा एकूण निकाल ९९ .९५ टक्के लागला आहे. त्यामध्ये, कोकण विभाग १०० टक्के निकाल लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. 

कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. राज्य शिक्षण मंडळामार्फत २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु कोरोनामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचे ठरले. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते संगणक प्रणालीत नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना २३ जूनपासून ९ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली. शाळांकडून संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे गुण विभागीय मंडळाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर विभागीय मंडळाने शाळांकडून आलेले अंतर्गत गुण एकत्रित करून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार करण्यासाठी प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठवले.  

नववीचा अंतिम निकाल, दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन याच्या आधारे विषयनिहाय निकालासाठीचे गुणदान करण्यात आले आहे. त्यानंतर राज्य स्तरावर १५ जुलैपर्यंत निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली. शुक्रवारी ऑनलाइन जाहीर होणारा निकाल विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून त्याची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

Web Title: 10th result site crash! Many students visit the website at the same time to see the results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.