जादूटोणा विरोधी साडेतीन वर्षात ११ गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:13 AM2021-07-14T04:13:11+5:302021-07-14T04:13:11+5:30

पुणे : सून पांढऱ्या पायगुणाची आहे, तिच्यामुळे तू आमदार मंत्री होणार नाही, असे सांगून त्यांचा संसार मोडण्यासाठी अघोरी कृत्याचा ...

11 crimes against witchcraft in three and a half years | जादूटोणा विरोधी साडेतीन वर्षात ११ गुन्हे

जादूटोणा विरोधी साडेतीन वर्षात ११ गुन्हे

Next

पुणे : सून पांढऱ्या पायगुणाची आहे, तिच्यामुळे तू आमदार मंत्री होणार नाही, असे सांगून त्यांचा संसार मोडण्यासाठी अघोरी कृत्याचा वापर झाल्याचे दिसून आल्याने चतु:श्रृंगी पोलिसांनी ज्योतिषाचार्य रघुनाथ येमूलला अटक केली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरात गेल्या साडेतीन वर्षात जादूटोणा कायद्यान्वये आतापर्यंत तब्बल ११ गुन्हे दाखल आहेत. या ११ गुन्ह्यात तब्बल ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

यावर्षी जानेवारीपासून जून अखेर अशा प्रकारचे ४ गुन्ह्यांमध्ये १४ आरोपी आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात एकही गुन्हा दाखल झाला नव्हता. २०१९ मध्ये जादूटोणा कायद्यान्वये ६ गुन्हे दाखल असून त्यात १४ आरोपी आहेत.

जादूटोणा कायद्यान्वये दाखल झालेले गुन्हे

वर्ष दाखल गुन्हे आरोपी

२०१८ १ २

२०१९ ६ १४

२०२० - -

जून २०२० ४ १४

Web Title: 11 crimes against witchcraft in three and a half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.