शेक देताना शेकोटीत पडून ११ दिवसांचे बाळ गंभीर जखमी; कोंढवा परिसरातील प्रकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:43 PM2017-11-22T12:43:13+5:302017-11-22T12:48:16+5:30

कोंढवा परिसरात भाग्योदय नगर येथे ११ दिवसांचे बाळ शेक देताना अचानक शेकोटीत पडून गंभीर भाजल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी साडे अकरा वाजता घडला.

11-day-old child injured; incident in Kondhwa area | शेक देताना शेकोटीत पडून ११ दिवसांचे बाळ गंभीर जखमी; कोंढवा परिसरातील प्रकार 

शेक देताना शेकोटीत पडून ११ दिवसांचे बाळ गंभीर जखमी; कोंढवा परिसरातील प्रकार 

Next
ठळक मुद्देबाळावर खासगी रुगणालयात उपचार सुरू; बाळ ८० ते ८५ टक्के भाजलेबाळाची प्रकृती चिंताजनक : अग्निशामक दल

पुणे : कोंढवा परिसरात भाग्योदय नगर येथे ११ दिवसांचे बाळ शेक देताना अचानक शेकोटीत पडून गंभीर भाजल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी साडे अकरा वाजता घडला. या बाळावर खासगी रुगणालयात उपचार सुरू आहेत. मात्र ते बाळ ८० ते ८५ टक्के भाजले आहे.
मोहंमद सगीर शेख (रा. सुमित्रा अपार्टमेंट, भाग्यदोय नगर, कोंढवा) असे बाळाच्या वडिलांचे नाव आहे. बाळाची आई त्याला शेक देत होती. त्यावेळी ती त्याला तेथे ठेऊन आत गेली आणि त्याच वेळी बाळ अचानक एका अंगावर झाले आणि त्या शेकोटीवर पडले. शेकोटीवरील भांडे खाली पडले. त्यामुळे कागदी पोत्यांना आग लागली. त्यात बाळ गंभीर जखमी झाले. बाळाला खासगी रुग्णालयात नेले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले.

Web Title: 11-day-old child injured; incident in Kondhwa area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.