पुणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस व थंडीने अकराशे शेळ्या-मेंढ्या दगावल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 10:03 AM2021-12-03T10:03:45+5:302021-12-03T10:07:32+5:30
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व थंडीने जिल्ह्यात कहर केला आहे. यामुळे जिल्ह्यातल्या १ हजार ...
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व थंडीने जिल्ह्यात कहर केला आहे. यामुळे जिल्ह्यातल्या १ हजार १३५ शेळ्या-मेंढ्या दगावल्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पिकांचेही अतोनात नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असताना गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. पावसासोबतच कडाक्याची थंडी पडल्याने मोठा फटका मेंढपाळ व शेतकऱ्यांना बसला.
अनेक द्राक्ष बागांबरोबरच लागवडीला आलेली कांद्याची रोपे भुईसपाट झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात असताना झालेल्या अवकाळी पावसाने गहू, हरभरा व अन्य कडधान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांची व गोठ्यांची पडझड झाली आहे. सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
शेळा-मेढ्यांच्या तालुकानिहाय नुकसानीचा प्राथमिक अंदाज
तालुका गाव --ठार शेळ्या-मेंढ्या
आंबेगाव १० --१६९
शिरूर ५ --१०९
खेड ४ --७३
जुन्नर १५ --५४१
हवेली २ --१७
भोर १ --२
मावळ २ --३६
बारामती ६ --४०
दौंड ३ --२४
पुरंदर ७ --११९