लॉकडाऊनमुळे सहली रद्द झाल्याने ग्राहकांची ११ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:12 AM2021-09-14T04:12:50+5:302021-09-14T04:12:50+5:30
पुणे : फिरण्यासाठी आठ जणांनी हॉलिडे पॅकेजसाठी पैसे भरले होते. मात्र, त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे सहली रद्द ...
पुणे : फिरण्यासाठी आठ जणांनी हॉलिडे पॅकेजसाठी पैसे भरले होते. मात्र, त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे सहली रद्द झाल्या. तेव्हा ग्राहकांनी भरलेले पैसे परत न करता ‘इन्जॉय व्हॅकेशन या टुर्स अँड ट्रॅव्हलर्स’ने फसवणूक करून ११ लाख २७ हजार ८०० रुपयांना गंडा घातला.
याप्रकरणी रणछोड नगीनदास नागर (वय ७१, रा. शांतीनगर सोसायटी, गंगाधाम, कोंढवा) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी भुपेशा ऊर्फ विकी बाळकृष्ण ठक्कर (रा. बालाजीनगर, धनकवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ठक्कर याचे ‘इन्जॉय व्हॅकेशन’ या नावाचे टुर्स अँड ट्रॅव्हल्सचे धनकवडीतील के. के. मार्केटमध्ये कार्यालय आहे. फिर्यादी व इतर ७ जणांनी डिसेंर २०१९ मध्ये हॉलिडे पॅकेज बुक करून ठरल्याप्रमाणे सर्व पैसे भरले. मात्र, मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे सहली रद्द करण्यात आल्या. सहली रद्द केल्याने फिर्यादी व इतरांनी पैसे परत मागितले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पैसे परत न केल्याने ११ लाख २७ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.