जेजुरी देव संस्थानकडून मुख्यमंत्री साह्यता निधीस ११ लाखांचा मदतनिधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:15 AM2021-08-22T04:15:07+5:302021-08-22T04:15:07+5:30
राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाला राज्यातील सर्व देवस्थांनानी मदत करावे, असे आवाहन राज्याचे धर्मादाय आयुक्त पी. एस. तरारे यांनी ...
राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाला राज्यातील सर्व देवस्थांनानी मदत करावे, असे आवाहन राज्याचे धर्मादाय आयुक्त पी. एस. तरारे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देताना जेजुरीच्या मार्तंड देव संस्थानने ही मदत केली असल्याचे देव संस्थानचे मुख्य विश्वस्त पंकज निकुडे यांनी सांगितले. त्याच बरोबर मार्तंड देव संस्थान आणि तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखड्यासाठी शासनाने साडे तीनशे कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभारही मानण्यात आले.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद आहे. जेजुरीकरांची उपजीविका ही मंदिरावरच अवलंबून असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जेजुरीकरांचे अर्थकारण हे मंदिरावरच अवलंबून असल्याने शासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या अटीवर खंडोबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी ही विश्वस्त मंडळाने केली आहे.
त्याचबरोबर देव संस्थानच्या वतीने लवकरच सर्व सोयी-सुविधांयुक्त असे अद्ययावत प्रसूतिगृह बांधण्याचा मानस असून या इमारतीच्या भूमिपूजनास मुख्यमंत्र्यांना सपत्नीक निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी विश्वस्त संदीप जगताप, शिवराज झगडे, तुषार सहाणे, सॉलिसिटर अड् प्रसाद शिंदे, अड् अशोक संकपाळ, देव संस्थानचे मुख्याधिकारी राजेंद्र जगताप उपस्थित होते.
-
फोटो २१ जेजूरी संस्थानाकडून अकरा लाख
फोटो ओळी : देव संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री साह्यता निधीस ११ लाखांचा धनादेश सुपूर्त करताना विश्वस्त मंडळ.
210821\1939-img-20210821-wa0053.jpg
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धनादेश सुपूर्त करताना